शहरातील नागरिकांची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करावी, साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांची बिले त्वरित अदा करावी अन्यथा कारखान्यांवर गुन्हे दाखल करावे, कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयाचा खर्च शासनाने अदा करावा, विद्यार्थ्यांना शिक्षण फी माफी करणे आणि नवीन वर्गात प्रवेश देणे, पंढरपूर-सोलापूर तिऱ्हे मार्गाच्या रस्त्याची दुरूस्ती करणे, ६५ एकर परिसरातील रुग्णालयात मोफत उपचार करावे, सर्व आठवडे बाजार सुरू करावेत, उपजिल्हा रुग्णालयात अद्ययावत सोयी-सुविधा निर्माण करणे, अशा विविध मागण्यांसाठी मनसेने तहसीलदार सुशील बेल्हेकर यांना निवेदन दिले. या मागण्या पूर्ण न झाल्यास लवकरच आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे राज्य सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी दिला.
यावेळी तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, विधानसभा अध्यक्ष अनिल बागल, शाखाध्यक्ष स्वप्निल जाधव, तेजस गांजाळे, सहकार सेनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब चौगुले, शुभम काकडे, नागेश इंगोले, विनोद बागल, अभिमान डुबल आदी उपस्थित होते.
फोटो ::::::::::::::::::
विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार सुशील बेल्हेकर यांना देताना मनसेचे राज्य सरचिटणीस दिलीप धोत्रे व अन्य पदाधिकारी.