वाटंबरे येथील नारायण निवृत्ती पवार व त्यांची मुले संतोष व मारुती हे मंगळवारी शेतात लिकेज झालेली पाईपलाईन काढण्याकरता गेले होते. ते तिघे जमीन खोदत असताना राजाराम निवृत्ती पवार, सिद्धेश्वर राजाराम पवार, रोहित राजाराम पवार व भारती राजाराम पवार यांनी तेथे येऊन राजाराम पवार याने तुम्ही पाईपलाईन लिकेज काढू नका, मला येथे शेततळे घ्यायचे आहे, असे म्हणाले. यावेळी नारायण पवार यांनी तुमचे शेततळे सुरू झाल्यानंतर आम्ही पाईपलाईन बाजूला घेतो, तोपर्यंत आम्हाला पाईपलाईन लिकेज काढू द्या, असे म्हणाले. त्यावेळी त्याने शिवीगाळ करत बेडग्याच्या दांडक्याने तर मुलगा सिद्धेश्वर पवार याने संतोष यास काठीने मारहाण करू लागला. त्यावेळी मारुती हा सोडवण्यासाठी मध्ये आला असता रोहित पवार याने त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. तर भारती पवार हिने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ,
दमदाटी सुरु केली. याबाबत नारायण पवार यांनी चौघांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.