पंढरपूर : सध्या विधानसभेच्या निवडणुक आचारसंहितेमुळे पंढरपूर शहरात सुरू असलेल्या नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी एका गाडीमधील चार लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे़ ही कारवाई सोमवारी दुपारी एकच्या सुमारास केली.
दरम्यान, निलेश कोंडलकर हे एच १० बीएम ४५३६ या गाडीने मंगळवेढाकडून पंढरपूरकडे येत होते. ते पंढरपूर येथील हिंदू स्मशानभूमीजवळ आले असता, पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. पोलिसांनी या गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये चार लाख रुपयांची रोख रक्कम सापडली. गाडी मालक हे अनवली येथील पेट्रोलपंपाचे मालक असून त्यांचे नाव निलेश कोंडलकर असल्याचे पोलीसांनी सांगितले.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक करे, पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल बापू झोळ, बिपिन ढेरे, आर जी खेडेकर, विजय सांगोलकर, मच्छिंद्र राजगे, प्रसाद आवटी यांनी केली आहे. त्याचबरोबर यावेळी आचारसंहिता पथकातील एस. बी. बेउर, सुनील वालुजकर, पोलीस कॉन्स्टेबल अमित वाघमारे, उपस्थित होते.