पटवर्धन कुरोली - पटवर्धन कुरोली ता पंढरपूर येथे बुधवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ऊसतोडणी साठी आलेल्या अनिता लालसिंग तडवी या कुटुंबातील 4 महिन्याच्या मुलाला बिबट्याने खाल्ले आहे. भर पालवर येऊन बिबट्याने मुलाचे तोंड आपल्या जबड्यात पकडले होते. मुलाच्या आईने आरडा ओरड केल्याने बाजूची लोक जमा झाले बॅटरी चा उजेड करताच अर्धवट खाल्लेल्या मुलाचे शरीर टाकून बिबट्याने धूम ठोकली या प्रकाराने पटवर्धन कुरोलीत खळबळ उडाली आहे.
पटवर्धन कुरोली येथे विठ्ठल कारखान्याच्या ऊसतोडणी टोळ्या आल्या आहेत. नवनाथ झांबरे (रा देवडे ता पंढरपूर) यांची टोळी पट कुरोली येथे ऊसतोडणी साठी आली आहे. ही टोळी हरिदास गणपत पाटील यांच्या घराशेजारील शेतात उतरली हाती टोळ्या उतरल्या आहेत त्याच्या बाजूला एक मोठा ओडा आहे. हे ऊसतोडणी कुटुंब आज बुधवार बाजाराचा दिवस म्हणून लवकर आले होते अंधार पडल्या नंतर बिबट्या व त्याची दोन पिले ओढ्यातून बाहेर आली व टोळीतील कोपटांच्या समोर असलेल्या 4 महिन्याच्या मुलाला आपल्या जबड्यात उचलले हा प्रकार समजताच त्याची आई आणिताने आरडा ओरड सुरू केली हे ऐकून विजपम्प सुरू करण्यासाठी नदीकडे चाललेल्या गणपत पाटील व हरिदास पाटील या पिता - पुत्राने टोळीकड धाव घेतली तर त्या ठिकाणी बिबट्या मूळचे तोंड आपल्या जबड्यात धरून उभा दिसला हे बघून त्यांनी ही ओरडायला सुरवात केली. व हातातील बॅटरी त्या बिबट्याच्या तोंडावर दाबली येथील कळवा एकूण आजूबाजूचे लोक ही धावत येऊ लागले याची चाहूल लागताच अर्धवट खाल्लेल शरीर टाकून बिबट्याने धूम ठोकली.
त्यानंतर टोळीतील इतर नागरिक व पटवर्धन कुरोली येथील नागरिकांनी येथील खाजगी डॉक्टर गौतम भिंगारे यांच्याकडे नेले आसता मुलगा मयत आसल्याचे त्यांनी सांगितले गेल्या अनेक दिवसापासून बिबट्या गादेगागाव वाखरी उपरी पिराची कुरोली परिसरात असल्याची चर्चा होती अनेक ठिकाणी शेळ्या जनावरांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या होत्या.
मागील पंधरा दिवसांपूर्वी पट कुरोली येथील सात मायनर आडव्या ओढ्यात बिबट्याचं दर्शन झाल्याची घटना घडली होती तरी काही जणांनी हा विषय फारसा गांभीर्याने घेतला नव्हता मात्र आज प्रत्यक्ष बीबट्यानं मनुष्य वस्तीत प्रवेश करीत चार महिन्याच्या मुलाला खाल्याने खळबळ उडाली आहे