अकलूज उपविभागांतर्गत अकलूज, माळशिरस, नातेपुते व वेळापूर या पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून विनामास्क ४६१२, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे ६२७, सोशल डिस्टन्सिंग १०४९, पाचपेक्षा जास्त गर्दी ३, वेळेनंतर सुरू असलेल्या आस्थापना ३६, जप्त वाहने ९७, आस्थापना सील १५, विनाकारण फिरणारे १८ अशा ६५९३ केसेस दाखल केल्या आहेत, तर अकलूज १० लाख ५ हजार ९०० रुपये, माळशिरस ७ लाख ५४ हजार ५५०, नातेपुते ६ लाख ४८ हजार २००, वेळापूर २ लाख ४५ हजार १००, असा २६ लाख ५३ हजार ७५० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
पोलीस कारवाईची धास्ती
अत्यावश्यक सेवा वगळता इतर कारणास्तव नागरिकांनी घराबाहेर पडू नये. यासंदर्भात प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही अशा विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी खाक्या दाखवल्यामुळे रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या रोडावली. पोलीस कारवाईची धास्ती तालुक्यातील नेत्यांसह नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
कोट :::::::::::::::::::::
ग्रामीण भागातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या दृष्टीने कडक कारवाईची अंमलबजावणी करावी लागत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे.
- नीरज राजगुरू
उपविभागीय पोलीस अधिकारी