सोलापूर : तीन डॉक्टर व एका नर्सला 'कोरोना'ची बाधा झाल्याची घटना ताजी असतानाच आता शहरातील एका नगरसेवकासह चार जणांना 'कोरोना'ची बाधा झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले आहे. शासकीय रुग्णालयाकडून आलेल्या अहवालात एका रुग्णाला एन्फ्यूएन्जा, एकाला सारी तर दोन जणांना कोरोणाची लाग झाल्याचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी सांगितले. अशाप्रकारे जिल्ह्यातील कोरणा रुग्णांची संख्या एकूण ६५ इतकी झाली आहे.
कुमठा नाका येथील नगरसेवक (मूळ रा. न्यू तिºहेगाव, फॉरेस्ट) यांचा संपर्क भारतरत्न नगरातील कोरोना पॉझीटीव्ह महिलेच्या संपर्कातील व्यक्तींशी झाला होता. त्या महिलेच्या मृत्यूनंतर त्यांना क्वारंटाईन होण्याबाबत सूचना दिली होती असे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना २५ एप्रिल रोजी त्यांना सर्दी खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची चाचणी केल्यावर एन्फ्लूएंजा चाचणी पॉझीटीव्ह आली आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील पत्नी व संपर्कातील इतर लोकांना तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
सिव्हिल हॉस्पीटलमागील नाथ प्राईडमध्ये राहणाºया ५८ वर्षीय गृहस्थांना त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केल्यावर त्यांचा अहवाल कोरोना पॉझीटीव्ह आला आहे. तसेच शास्त्रीनगरातील एका ५६ वर्षीय महिलेला व ४५ वर्षीय व्यक्तीला सारीची लागण झाली आहे.
पंढरपूरचे दोन डॉक्टर क्वारंटाईन
पाटकुल येथील महिला पंढरपुरातील एका खाजगी रुग्णालयात बाळंत झाली. त्यानंतर तिचा अहवाल पॉझीटीव्ह आल्याने त्या खाजगी रुग्णालयातील दोन डॉक्टरांसह १४ जणांना तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी दिली. या सर्वांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.