शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
2
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
3
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
4
मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय?
5
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
6
विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!
7
भ्रष्टाचार निर्मूलन: संवेदनशील सत्यनिष्ठा हवी! काम लवकर होण्यासाठी 'किड' वाढवू नका!
8
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
9
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
10
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
11
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
12
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
13
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
14
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
15
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
16
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
17
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
19
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
20
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)

सोलापूरजवळ चार वाहनांचा विचित्र अपघात; महिलेचा जागीच मृत्यू, चौघे जखमी

By appasaheb.patil | Published: June 23, 2023 4:14 PM

सुप्रिया गणेश नरखेडकर (रा. अनगर, ता. मोहोळ) असे मयत महिलेचे नाव आहे.

सोलापूर : सोलापूर-पुणे महामार्गावर बाळे गावाजवळ चार वाहनांचा शुक्रवारी दुपारी  विचित्र अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून अन्य तीन ते चार जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

सुप्रिया गणेश नरखेडकर (रा. अनगर, ता. मोहोळ) असे मयत महिलेचे नाव आहे. सोलापूरहून पुण्याकडे निघालेला हायवा टिपर भरधाव वेगात जात होता. यावेळी वेगात असलेल्या टिपरने दुचाकीला जोराची धडक दिली. त्यानंतर कारला धडक देऊन कंटेनर ट्रकवर हायवा आदळला. या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे हे दाखल झाले. पोलिसांनी लावलेल्या नाकाबंदी पॉईंटमुळेच अपघात झाल्याचा आरोप करत आक्रमक शिवसैनिकांनी सोलापूर पुणे महामार्ग काही वेळसाठी रोखून धरला. शिवसैनिकांनी केलेल्या रास्ता रोकोमुळे सोलापूरकडे जाणारी वाहतुक काही काळ थांबली, त्यामुळे वाहनांच्या लांब रांगा होत्या. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.

टॅग्स :AccidentअपघातSolapurसोलापूर