शंकर शिवाजी जानकर यांनी मुलांचे शिक्षण, घरखर्च व शेतीच्या खर्चासाठी गावातील
खाजगी सावकार अंकुश काशिनाथ जानकर व आनंदा बिराप्पा जानकर यांच्याकडून दरमहा २ टक्के व्याजाने ८ लाख ३६ हजार ७०० रूपये घेवून त्यांनी जमीन गट नं. ३९३/२/अ मधील क्षेत्र हे. ६० आर. जमीन परत फिरवून देण्याच्या बोलीवर तारण ठेवली होती. दरम्यान शंकर जानकर यांनी २८ मार्चपर्यंत व्याजाने घेतलेल्या पैशाचे ६ लाख ८८ हजार १६२ रूपये व्याज व मुद्दल असे मिळून १५ लाख २४ हजार ८६२ रूपये त्या दोन खाजगी सावकारांना परत दिले. मात्र तारण ठेवलेल्या जमिनीचे परत खरेदीखत करून देण्यास टाळाटाळ करून चक्रवाढ व्याजाने आणखी ८ लाख रुपयांची मागणी करत त्या दोघांनी उडवाउडवीची उत्तरे देत सदरची रक्कम दिली नाही तर आम्ही जमीन फिरवून देणार नाही, तुला काय करायचे ते कर, असे म्हणून दमदाटी करत फसवणूक केली.
याबाबत शंकर जानकर यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी अंकुश काशिनाथ जानकर व आनंदा बिराप्पा जानकर यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.