सोलापूर : जिल्हा प्रशासन सेतू सुविधा केंद्र चालविणाºया गुजरात इन्फोटेक कंपनीला विविध दाखल्यांसाठी अर्ज देणार आहे. कंपनीने हे अर्ज मोफत उपलब्ध करुन द्यायचे आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सेतू केंद्रामधून लवकरच मोफत अर्ज उपलब्ध होतील, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली.
जिल्हा सेतू केंद्राबाबत जिल्हा प्रशासनाकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. विविध दाखल्यांसाठीचे अर्ज मोफत देणे अपेक्षित असताना कंपनीकडून यासाठी पैसे आकारण्यात येत आहेत. गर्दीचे नियंत्रण होत नाही, अशा विविध तक्रारींचा समावेश होता. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी या तक्रारींची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अधिकाºयांनी अहवालही सादर केला.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सोमवारी बैठक घेतली. निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह तक्रारी करणारे सामाजिक कार्यकर्ते, गुजरात इन्फोटेकचे अधिकारीही उपस्थित होते. अर्ज विक्रीचा विषय निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी एक प्रस्ताव समोर ठेवला. विविध दाखल्यांसाठी लागणारे अर्ज जिल्हा प्रशासन छापून घेईल. हे अर्ज कंपनीला देण्यात येतील. कंपनीने हे अर्ज सर्वसामान्यांना मोफत द्यायचे आहे़ कंपनीचे अधिकारीही या निर्णयावर राजी झाले.
तेली म्हणाले, विविध दाखल्यांसाठी अर्ज छापून घेण्यासाठी प्रशासनाला ५० हजार रुपये खर्च येईल. हे अर्ज सामान्य माणसाला मोफत मिळतील. त्यामुळे तक्रारी येणार नाहीत, अशी अपेक्षा आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सूचना दिल्या आहेत. सेतू केंद्राजवळची आणखी एक खोली उपलब्ध करुन दिली जाणार आहे. शिवाय भारनियमनाच्या काळात अडचण होऊ नये म्हणून बॅकअॅपही उपलब्ध करुन देत आहोत.
लोकांना चांगली वागणूक द्याच्सेतू केंद्रातील कर्मचारी सामान्य माणसाला चांगली वागणूक देत नाहीत, अशाही तक्रारी आल्या होत्या. यासंदर्भात दक्षता घेण्याची सूचना जिल्हाधिकाºयांनी केली. उध्दट वर्तन करणाºया एका कर्मचाºयाला कामावरुन कमी करण्यात आल्याचेही सेतू व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले.