बार्शी : बार्शी तालुक्यातील मधुबन फार्म व नर्सरी तसेच अखिल भारतीय सीताफळ महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने सीताफळ लागवड व विक्री व्यवस्थापन या विषयावर एक दिवसीय मोफत प्रशिक्षण आयोजित केल्याची माहिती डॉ. नवनाथ कसपटे यांनी दिली.
हे मोफत प्रशिक्षण तालुक्यातील खामगाव येथे रविवारी २९ ऑगस्ट रोजी होत आहे. यावेळी शेतकऱ्यांना सीताफळ लागवडीपासून ते विक्रीपर्यंत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यात ४२ सीताफळ वाणाच्या लागवडीची, सीताफळ पीक उत्पादनाची विविध प्रात्यक्षिके, पूर्व मशागत ,लागवड पद्धती , कीड रोग व्यवस्थापन , एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन , बहार व्यवस्थापन व सीताफळ मार्केटिंग व्यवस्थापन याची माहिती दिली जाणार आहे. (वा. प्र.)