आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २४ : ग्रामीण भागातील गर्भवती महिलांसाठी आरोग्य विभागाने विशेष योजना हाती घेतली आहे. याअंतर्गत गर्भवती महिलेला ग्रामीण रुग्णालयात पहिल्या महिन्यापासून प्रसूतीपर्यंत सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा मोफत मिळणार आहेत. यात गर्भवतीला गावातून ग्रामीण रुग्णालयात पोहोचविणे, तपासण्या आणि सिझेरियनपर्यंतच्या सुविधांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात अकलूज आणि बार्शी येथील ग्रामीण रुग्णालयात डिसेंबरपासून या कामाला सुरुवात होत आहे. आरोग्य विभागाने संचालक डॉ. संजीवकुमार, डॉ. व्यास यांच्या संकल्पनेतून राज्यभरात ही मोहीम राबविली जात आहे. केवळ पैसे नसल्याने अनेक गर्भवतींना चांगले उपचार मिळत नाहीत. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर गर्भवती महिलेची पहिल्या महिन्यापासून तपासणी करतील. यात बाळाची वाढ, गर्भवतीचे आरोग्य, आहार, व्यायाम आदींबद्दलही मार्गदर्शन केले जाईल. आशा स्वयंसेविकांची यात महत्त्वाची भूमिका असेल. या स्वयंसेविकाच गर्भवतीला ग्रामीण रुग्णालयापर्यंत घेऊन जातील. --------------------१२ हजारांचे टार्गेट जिल्ह्यात दर एक हजार लोकसंख्येमागे एक आशा स्वयंसेविका नेमण्यात आली आहे. त्यानुसार सध्या जिल्हाभरात २ हजार ६०० आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. महिलांच्या प्रसूतीचा पायलट प्रोजेक्ट प्रारंभी बार्शी व माळशिरस या दोन तालुक्यांमध्ये राबविण्यात येत आहे. त्यानुसार या दोन तालुक्यात प्रत्येकी सहा हजार प्रमाणे बारा हजार महिला गरोदर असल्याचे सर्व्हेमध्ये आढळून आले आहे.-------------------डॉक्टरांनाही मिळणार भरगच्च मानधन...या मोहिमेसाठी नेमण्यात आलेल्या प्रमुख डॉक्टरला महिन्याकाठी ५० हजार रुपये वेतन मिळेल. त्याचबरोबर या डॉक्टरला सर्वसाधारणपणे प्रसूती होणाºया महिलेमागे १ हजार ५०० रुपये आणि सिझेरियन प्रसूती झाल्यास ४ हजार रुपये मिळतील. या डॉक्टरांच्या मदतीला आणखीही वैद्यकीय अधिकारी असतील. या सुविधा मोफत मिळतील आशा वर्कर गर्भवती महिलेला गावातून ग्रामीण रुग्णालयापर्यंत घेऊन येतील. ग्रामीण रुग्णालयात गर्भवतीच्या तपासण्या होतील. ९ महिन्यापर्यंत विविध टप्प्यात तपासणीसाठी आशा वर्करला घेऊन यावे लागेल. वाहतूक, तपासण्या मोफतच असेल. सर्वसाधारण प्रसूती असो वा सिझेरियन असो त्यासाठीही पैसे द्यावे लागणार नाहीत.-----------------------------सीईओ डॉ. राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी, अकलूज येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथम ही योजना कार्यरत होईल. हे काम यशस्वी ठरल्यानंतर इतर ठिकाणीही काम सुरू होईल. यातून माता-बालकांचे आरोग्य राखण्याबरोबर जननदर वाढविण्याचा प्रयत्न आहे. -डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर.
गर्भवती महिलांना मिळणार मोफत आरोग्य सेवा सुविधा, सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाची विशेष योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 10:36 AM
ग्रामीण भागातील गर्भवती महिलांसाठी आरोग्य विभागाने विशेष योजना हाती घेतली आहे. याअंतर्गत गर्भवती महिलेला ग्रामीण रुग्णालयात पहिल्या महिन्यापासून प्रसूतीपर्यंत सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा मोफत मिळणार आहेत.
ठळक मुद्देजिल्ह्यात दर एक हजार लोकसंख्येमागे एक आशा स्वयंसेविका नेमण्यात आली जिल्हाभरात २ हजार ६०० आशा स्वयंसेविका कार्यरत महिलांच्या प्रसूतीचा पायलट प्रोजेक्ट प्रारंभी बार्शी व माळशिरस या दोन तालुक्यांमध्ये डॉक्टरांनाही मिळणार भरगच्च मानधन...सर्वसाधारण प्रसूती असो वा सिझेरियन असो त्यासाठीही पैसे द्यावे लागणार नाहीत.