दीपक दुपारगुडे
सोलापूर : डेरा, अर्थात माठ. गरीबांचा जणू फ्रीज्च. पण हाच माठ यंदा माती आणि जळणाच्या वस्तूंचे (लाकूड, कोळसा) दर वाढल्यामुळे यंदा भाव खात आहे. गतवर्षीच्या तुलनेत माठाच्या किंमती २० टक्क्यांनी वाढल्या आहेत.
उन्हाचा पारा वाढण्यास सुरुवात झाली असून, घशाची कोरड वाढली आहे. गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाºया माठाची मागणी वाढत आहे. कुंभार व्यावसायिकांच्या वर्षभर मेहनतीनंतर उन्हाळ्यात माठांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. सोलापुरात ठिकठिकाणी माठ विक्रीसाठी दुकाने थाटलेली आहेत आणि खरेदीचा जोर वाढत आहे. गरिबांचा फ्रीज म्हणून मातीचे माठ सर्वांनाच परिचित आहे.
याशिवाय उन्हाळ्यात मातीच्या माठातील पाणी शरीराला थंडावा देतेच, याशिवाय आरोग्यासाठीही लाभदायक असल्याने अगदी समाजातील सर्वच स्तरातील नागरिक मातीचे माठ खरेदी करणे पसंत करतात. उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. उन्हाचा पारा उंचावला आहे. त्यामुळे नागरिकांना आता थंड पाण्याची आवश्यकता भासू लागल्याने माठाची मागणी मोठी आहे. मात्र बदलत्या काळानुसार थंडगार पाण्याच्या माठाची जागा आरो वॉटर मशीन, मिनरल वॉटर, पाण्याचे पाऊच, पाण्याचे जार, थंड पाण्याच्या बाटल्या, ‘इलेक्ट्रॉनिक फ्रीज’ने घेतली आहे. त्यामुळे कुंभार व्यावसायिकांवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. परंतु आजही थंड पाण्यासाठी सगळीकडे माठच वापरला जातो. आता होळीनंतर माठांची मागणी वाढणार असून तेजी येईल, असा माठ व्यावसायिकांचा अंदाज आहे.
चिनी मातीच्या माठाला अधिक मागणी- शहरामध्ये रंगभवन, सैफुल, बाळी वेस, कुंभार वेस, सात रस्ता, जुना पुणे नाका, सतर फूट रोड येथे लहान-मोठ्या आकारातील लाल, काळ्या रंगाचे माठ आणि नळ लावलेले माठ विक्रीसाठी दाखल झाले आहेत. सद्या उन्हाचा कडाका वाढल्याने माठांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असून, नागरिकांतून चांगली मागणी वाढली आहे. सध्या १०० ते ३०० रुपयांपर्यंत असलेल्या माठांची विक्री होत असून नळ असलेल्या माठांची किंमत थोडी जास्त असल्याचे दिसून येत आहे. तर पांढºया, लाल व चिनी मातीपासून तयार केलेल्या माठाला अधिक पसंती मिळत आहे.
मातीच्या भांड्यांचा वापर वाढला- आरो वॉटर मशीन, मिनरल वॉटर, पाण्याचे पाऊच, पाण्याचे जार, थंड पाण्याच्या बाटल्या, ‘इलेक्ट्रॉनिक फ्रीज’ या नवीन तंत्रालाही मातीचे भांडे देत आहेत टक्कर. पाण्याची बाटली, माठ, पातेले, तवा, गाडगे, ताट, वाटी अशी मातीपासून बनवलेली भांडी बाजारात आहेत. मातीच्या भांड्यांचा वापराने आरोग्यास अनेक फायदे मिळतात.
२० टक्के किंमत वाढली- माठाची किंमत गेल्या वर्षीपेक्षा २० टक्के वाढली आहे. माठ घेताना लोक माठाच्या सौंदर्याकडे पाहून खरेदी करत आहेत. लाल मातीचे बनलेले माठ हे फक्त दिसायला सुंदर दिसतात, परंतु या माठातील पाणी लवकर थंड होत नाही. काळ्या मातीच्या माठातील पाणी शरीरासाठी आरोग्याच्या दृष्टीने उपायकारक आहे. मुख्यत: महाराष्ट्राची माती ही देशभरात थंड पाणी होण्यासाठी प्रसिद्ध आहे, तर आंध्रातील माती ही मातीच्या भांड्यापासून बनवलेल्या वस्तूंचा वापर केल्याने शरीरास फायदा मिळतो. त्यामुळे नागरिकांनी सजावटीकडे न पाहता काळ्या रंगाचे माठ घ्यावे, जेणेकरून आपल्या आरोग्यासाठी हितकारक असेल असे माठ विक्रेते आणि व्यावसायिक शरणबसप्पा शिवाजी कुंभार यांनी सांगितले़