येथील विरक्त मठाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या इरणा सिद्धाराम कोळ्ळे (रा. माळी गल्ली, अक्कलकोट) यांचे शेत आहे. गुरुवारी रात्री अचानकपणे वादळ वाऱ्यांसह पाऊस आला. त्याप्रसंगी सर्वत्र वीज बंद चालू होत होती. तेव्हा शेतकरी कोळ्ळे यांच्या शेतातील महावितरणच्या दोन ताराच्या घर्षणामुळे शेतातील घराला आग लागली. त्यापूर्वी वादळी वाऱ्यामुळे घरातील लोक शेतात उघड्यावर झोपले होते. पहाटेच्या वेळी ईरणा उठले असता, घरातून धूर येत पाहिले. त्यांनी आरडाओरडा केला. लोकांनी एकत्र येऊन आग विझवली.
अक्कलकोट नगरपालिकेचे अग्नी शामक दलाची मदत घेण्यात आली. त्यामध्ये शेती साहित्य व धान्य असे मिळून ४ लाखाचा मुद्देमाल जळून खाक झाला. आग विझवण्यासाठी नगरसेवक महेश हिंडोळे, नितीन हिंडोळे, महादेव झळके, सुरेश नंदीकोले, गुंडप्पा कांदे, रवी भंकापुरे, निलेश कोळ्ळे, सिद्राम कोळ्ळे, इरेशा कोळळे, बाबू नागुरे यांनी परिश्रम घेतले. तलाठी नूरद्दीन मुजावर यांनी पंचनामा केला. मंडल अधिकारी चंद्रकांत इंगोले यांनी भेट दिली आहे.
-----
२६अक्कलकोट-आग
अक्कलकोट येथील शेतकरी इरेशा कोळ्ळे यांच्या शेतातील जळालेल्या घराचा पंचनामा करताना पोलीस.
----