सोलापूर : रमजान महिन्यातील कडक उपवास करीत असताना शरीराला ऊर्जा आवश्यक असते. ही ऊर्जा देणारी काजू, बदाम, चारोळी, पिस्तासह अनेक मेवा-मिठाई सोलापूरकरांना मिळते हैदाराबाद, मुंबई, पुण्यातून. हीच मेवा-मिठाई सोलापुरातून मराठवाडा आणि कर्नाटकातही जाते. यंदा चारोळी, पिस्ता, अक्रोड वगळता इतर वस्तूंचे दर नियंत्रणात असल्याचे व्यापारी साकीब बागवान यांनी सांगितले.
रमाजान महिन्यातील उपवास हे थंड, पाणीदार फळांनी सोडतात. याबरोबरच मेवा-मिठाईचीही गरज भासते. सोलापूर शहरात किडवाई चौकात या वस्तूंचे स्टॉल मोठ्या प्रमाणात लागले असून, अख्ख्या शहराला येथून पुरवठा होतो. यंदाही काही वस्तू वगळता पुरवठा असून, त्यांचे दरही स्थिर आहेत. पुणे, मुंबईतून या साहित्यांची आवक आहे. हेच साहित्य सोलापुरातील व्यापाऱ्यांकडून कर्नाटकात गुलबर्गा, विजयपुरा, आळंद, मराठवाड्यात उस्मानाबाद, लातुरात जाते. सोलापुरात मंद्रुपसह भोवतालच्या गावांत हे साहित्य विक्रीला जाते.असे आहेत दर...काजू : २४० रु. पावकिलोबदाम : २४० रु. पावकिलोचारोळी : ४०० रु. पावकिलोपिस्ता : ६०० रु. पावकिलोखिसमिस : १२० रु. पावकिलोअक्रोड : ३५० रु. पावकिलोखजूर : ११० रु. पावकिलोकाबुली : १४० रु. पावकिलोखसखस : ८० रु. छटाकबडीशेप : ८० रु. छटाकइलायची : ६०० रु. पावकिलोशहाजिरा : १३० रु. पावकिलोदालचिनी : ९० रु. पावकिलोलवंग : २४० रु. पावकिलोदूध शेवया : २२० रु. किलो