महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता आनंद पवार व सहायक अभियंता अमित शिंदे यांच्या आदेशान्वये वरिष्ठ तंत्रज्ञ गणेश विठ्ठल रणदिवे, कर्मचारी शशिकांत दिघे, संतोष मोहिते, धनाजी गायकवाड, रणजित चव्हाण हे २३ फेब्रुवारी रोजी स. ११ वाजेच्या सुमारास सांगोला शहरातील कोष्टी गल्लीतील वीज ग्राहक रामचंद्र गोविंद डाणके यांच्याकडे थकीत वीज बील वसुलीसाठी गेले असता विनोद बाबर याने तेथे येऊन तुम्ही या भागात येऊन वीज बिल वसुली करू नका; अन्यथा एका- एकाचा पाय काढीन, अशी धमकी देऊन शिवीगाळ व दमदाटी करीत रामचंद्र डाणके यांना वीज बिल भरण्यास विरोध केला.
याबाबत महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ गणेश विठ्ठल रणदिवे यांनी फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद बाबूराव बाबर याच्याविरुद्ध भा.दं.वि. कलम ३५३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा घडल्यापासून तो फरार होता.