जिल्हा परिषदेच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली व दक्षिणचे बालविकास प्रकल्प अधिकारी सुधीर ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली विडी घरकुल येथे पोषण जत्रा भरविण्यात आली होती. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य रेणुका चांगले, सूरज पाटील, सचिन सुतार, अप्पाशा चांगले, रफिक काझी, माजी मुख्याध्यापक रामचंद्र बिराजदार, मुख्याध्यापिका उमा राऊत, पुष्पा कांबळे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी उपसरपंच वैशाली होनराव या होत्या. प्रारंभी पर्यवेक्षिका अनुराधा सोनकांबळे यांनी सर्वांचे स्वागत करून पोषण आहाराचे महत्त्व सांगितले. या पोषण जत्रेत अंगणवाडी सेविक, मदतनीस व परिसरातील महिलांनी सुमारे शंभर प्रकारचे विविध अन्नपदार्थ तयार करून आणले होते. त्याचे प्रदर्शन भरविले. विशेष म्हणजे उपस्थित पाहुण्यांनी या पदार्थांची चव चाखून उत्कृष्टतेबद्दल धन्यवाद दिले. प्रास्ताविक मेघा कदम तर, सूत्रसंचालन संगीता कोळी यांनी केले. आभार संध्या वाघमारे यांनी मानले.
--
फोटो : विडी घरकुल येथे भरविण्यात आलेल्या पोषण जत्रामध्ये सहभागी झालेल्या अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका.
२४विडी घरकुल