सोलापूर : ग्रामीण भागात शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. शेताकडे जाण्यासाठी अनेक शेतकºयांना रस्ताच नसल्याने पालकमंत्री पाणंद रस्ता योजनेतून २५४ किलोमीटर रस्त्यांचे काम अंतिम टप्प्यात असून, यामुळे शेतकºयांना किमान उन्हाळ्याच्या दिवसात तरी शिवारातून चांगल्या रस्त्यातून शेताकडे जाण्याची सोय झाली आहे.
अक्कलकोट तालुक्यात या योजनेतून ११ किलोमीटरपर्यंत रस्ते करण्यात येत आहेत. यासाठी ५ लाख ५0 हजारांचा निधी मंजूर आहे. बार्शी तालुक्यात १३ किलोमीटरपर्यंत पाणंद रस्ते करण्यात येत आहेत. यासाठी ६ लाख ५0 हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. करमाळा तालुक्यातील २0 किलोमीटरच्या रस्त्यासाठी १0 लाखांचा निधी देण्यात आला आहे. माढा तालुक्यातील २६ किलोमीटरच्या रस्त्यासाठी १३ लाखांचा निधी देण्यात आला आहे. माळशिरस तालुक्यातील २९ किलोमीटरच्या कामासाठी १४ लाख ५0 हजारांचा निधी देण्यात आला आहे.
मंगळवेढा तालुक्यातील १२ किलोमीटरच्या रस्त्यासाठी ५ लाख ७५ हजारांचा निधी देण्यात आला आहे. मोहोळ तालुक्यातील ३0 किलोमीटरच्या रस्त्यासाठी १४ लाख ९0 हजारांचा निधी देण्यात आला आहे. पंढरपूर तालुक्यातील ४१ किलोमीटरच्या पाणंद रस्त्यासाठी २0 लाख ६२ हजारांचा निधी देण्यात आला आहे. सांगोला तालुक्यातील २७ किलोमीटरच्या रस्त्यासाठी १३ लाख ५0 हजारांचा निधी देण्यात आला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील ११ किलोमीटरच्या रस्त्यासाठी ५ लाख ४0 हजार तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील ३५ किलोमीटरच्या रस्त्यासाठी १७ लाख ५0 हजारांचा निधी देण्यात आला आहे.
१ कोटी २७ लाखांचा निधी गेला मातीत- पालकमंत्री पाणंद रस्ता योजनेतून एका कामासाठी ५0 हजारांचा निधी देण्यात येत आहे. या रकमेत केवळ अर्धा किलोमीटरपर्यंतच्या रस्त्यावर माती टाकता येणे शक्य आहे. ही माती पावसाळ्यात पुन्हा वाहून जाणार आहे. त्यामुळे आतापर्यंत या योजनेतून दिलेला १ कोटी २७ लाखांचा निधी मातीतच वाहून जाणार, अशी प्रतिक्रिया शेतकºयांतून उमटत आहे.
निधी वाढविण्याची मागणी- पालकमंत्री पाणंद रस्ता योजनेतून केवळ तात्पुरते काम होणार आहे. शेतकºयांसाठी पाणंद रस्ते उपलब्ध होण्यासाठी खडीकरण व डांबरीकरणाची गरज आहे. डांबरीकरणाचा खर्च मोठा असल्याने किमान खडीकरण करण्याइतपत तरी निधीची तरतूद या योजनेतून करण्यात यावी, अशी अपेक्षा कारंबा ग्रामपंचायतीच्या सरपंच कौशल्या सुतार यांनी व्यक्त केली .