माळशिरस तालुक्यातील विविध गावातील रस्त्यांचा विकास आणि मजबुतीकरण व्हावे, यासाठी पंतप्रधान सडक योजनेतून निधी मिळावा, यासाठी आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी पाठपुरावा केला होता. माळशिरस तालुक्यातील सात रस्त्यांमधील ३२.४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या कामांसाठी केंद्रीय ग्रामविकास विभागामार्फत २४ कोटी ३४ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
यामध्ये गिरझणी - संग्रामनगर या ४.१०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी २ कोटी ५५ लाख, श्रीपूर - खंडाळी या ७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी ५ कोटी ५ लाख, वेळापूर ते महाळुंग या ७.५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी ५ कोटी ९५ लाख, खुडूस - पाणीव - विझोरी या ३.५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी २ कोटी ९३ लाख, खंडाळी - श्रीपूर या ३.५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी २ कोटी ६० लाख आणि माळखांबी जांबूड या ३.३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी दोन कोटी ५७ लाख असे मिळून या ७ रस्त्यांसाठी २४ कोटी ३४ लाख मंजूर झाले आहेत.
जिल्हा नियोजन समितीमार्फत तालुक्यातील अनेक रस्त्यांच्या विकासासाठी नुकताच निधी मंजूर झाला आहे. त्यानंतर आता या ७ रस्त्यांसाठी हा भरीव निधी मंजूर झाल्याने या रस्त्यांचे विशेष मजबुतीकरण होणार असल्याचे आ. मोहिते-पाटील यांनी सांगितले.