मागील तीन दशके ज्याची या भागातील शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते, आता ते काम अंतिम टप्प्यात आहे. ही योजना पूर्ण झाल्यानंतर अक्कलकोट तालुक्यातील १० हजार ११० हेक्टर, तर दक्षिण तालुक्यातील ७५०० हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येणार आहे. या मंजूर झालेल्या ३५ कोटींमधून जोड कालवा टप्पा क्रमांक १ व २ जोडणारा त्याचे अस्तरीकरण करणे, हरणा नदीकडे जाणारा दर्शनाळ कालवा, दक्षिण तालुक्यातील दर्गनहळ्ळी कालवा व होटगी वितरिका पाइपलाइनची आदी कामे पूर्ण केली जाणार आहेत.
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सतत पाठपुरावा सुरू ठेवून रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळविला. त्यामुळे आता मुख्य रस्ते पूर्ण होत आली आहेत. आता एकरुख उपसा सिंचन योजनेचा प्रश्न हा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जीवनात हरितक्रांती घडविणार आहे. या कामासही निधी मिळविला आहे.
कोट :::::::::
माझ्या दृष्टीने शेतकरी बांधव पाण्यावाचून वंचित राहू नयेत. शेती नुकसानीत राहून आर्थिक अडचणीत येऊ नयेत हा महत्त्वाचा प्रश्न आहे. यासाठी सतत पाठपुरावा आहे. त्यामुळे एकरुख उपसा सिंचन योजनेसाठी आता ३५ कोटी निधी मिळाला आहे.
- सचिन कल्याणशेट्टी,
आमदार, अक्कलकोट