आमदार राऊत यांनी कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, बांधकाम विभाग क्र. १, सोलापूर यांच्याकडे पत्राद्वारे निधीची मागणी केली होती.
त्याचप्रमाणे पूल दुरुस्ती कार्यक्रमातून तालुक्यात मागील वर्षीच्या पावसाळ्यात खराब झालेल्या व वाहून गेलेल्या महत्त्वाच्या रस्त्यांसाठी अतिरिक्त असे २ कोटींचा निधी जिल्हा नियोजन समितीतून मंजूर झाला आहे. यावेळी पंचायत समितीचे सभापती अनिल डिसले, उपसभापती मंजुळा वाघमोडे, माजी झेडपी सदस्य संतोष निंबाळकर, जि. प. सदस्य मदन दराडे, किरण मोरे, समाधान डोईफोडे, पंचायत समिती सदस्य इंद्रजित चिकणे, राजाभाऊ धोत्रे, अविनाश मांजरे, सुमंत गोरे, उमेश बारंगुळे उपस्थित होते.
या रस्त्यांना मिळाला निधी
कांदलगाव ते नागोबाची वाडी, रुई, अंबाबाईची वाडी, ज्योतिबाची वाडी ते जिल्हा हद्द , हिंगणी, नांदणी, लाडोळे, पिंपरी आर. ते सावरगाव नारी, वालवड, चारे, बोरगाव, बाभळगाव रस्ता, तडवळे, दहिटणे, राळेरास, धामणगाव दुमाला, मळेगाव ते नारी रस्ता, नारी ते भातंबरे, देवगाव मांजरी वस्ती ते बार्शी धस पिंपळगाव, पुरी ते धानोरे, सावरगाव ते मालेगाव, गोडसेवाडी ते खांडवी, गुळपोळी ते रस्तापूर, शेलगाव व्हळे ते खडकलगाव जिल्हा हद्द, जामगाव ते बिरोबा वस्ती, सौंदरे ते बावी आ. मालवंडी ते यावली, वैराग-सर्जापूर ते वैराग स्मशानभूमी पर्यंत, पांगरी ते यमाई मंदिर, टोनेवाडी ते कारी, निंबळक ते मालेगाव, आंबेगाव ते मिर्जनपूर, राऊळगाव शिव ते भालगाव या २२ रस्त्यांचा समावेश आहे.