टेंभुर्णी ते कुसळंब या रस्त्यासाठी १५७ कोटी रुपयांचा तर टेंभुर्णी शहरातील रस्त्यासाठी व आढेगाव पुलाच्या कामासाठी ७३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. माढा व मोहोळ तालुक्यातील नागरिकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या व दोन तालुक्यांना जोडणाऱ्या या मुख्य रस्त्यासाठी निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी आमदार बबनदादा शिंदे यांनी केली होती.
राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने ५ कोटी व केंद्र सरकारच्या केंद्रीय मार्ग निधीतून ४ कोटी रुपये असे एकूण ९ कोटी रुपये या रस्त्याच्या कामासाठी मंजूर करण्यात आल्यामुळे हा सुमारे १७ किलोमीटर लांबीचा रस्ता तयार होणार आहे. या रस्त्यास निधी मंजूर झाल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे.
----
फोटो : आमदार बबनदादा शिंदे