दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या भूसंपादनाच्या कामासाठी २४ कोटी रुपये मंजूर झाले असून, शेतकऱ्यांनी भूसंपादनास सहकार्य करावे, असे आवाहन नुकतेच आमदार शिंदे यांनी केले असता त्यावर माजी आमदार नारायण पाटील यांनी टीकास्त्र सोडले. याबाबत माजी आमदार पाटील म्हणाले, यांनी सांगितले की, दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी मी प्रत्येक अधिवेशनात तारांकित प्रश्न व लक्षवेधी सूचना मांडून योजनेस निधी मंजूर करून घेतला. सन २०१५ (१६.५० कोटी), सन २०१६ (११ कोटी), २०१७ (१७ कोटी), २०१८ (१६.४३ कोटी) व २०१९ (२४.८३ कोटी) असा निधी मंजूर करून घेतला. २०१९ ला या योजनेस भूसंपादनाच्या कामासाठी २४ कोटी रुपये मंजूर होऊन भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली असता, काही तांत्रिक बाबी, आचारसंहिता व कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या यामुळे ही कामे थांबली होती. परंतु, याचा अर्थ या कामास आता निधी मंजूर झाला असा होत नाही. लोकप्रतिनिधींनी भूसंपादन कामाचे श्रेय घेऊ नये, असे पाटील यांचे म्हणणे आहे.
दहिगावचा निधी मंजुरी माझ्या कालावधीतच : पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 4:19 AM