शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
3
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
4
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
5
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
6
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
7
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
8
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
10
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
11
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
12
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
13
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
14
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
16
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
17
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
18
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
19
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
20
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र

‘नको तो डामडौल, नको तो मॉल-राहूया स्मॉल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 1:00 PM

खेड्यातून शहरात आलेला आता घाबरलेला अन् गोंधळलेला माणूस म्हणतोय ‘गड्या आपुला गाव बरा.’

कोरोनाने जगभर हाहाकार माजवला असून मानवजातीच्या मानगुटीवर बसलेलं हे भूत काही केल्या उतरायला तयार नाही. शासन, प्रशासन प्रयत्नांची पराकाष्ठा करतंय, परंतु कोरोनाचा फैलाव रोखण्यात त्यांना यश येताना दिसत नाही. शहरातील माणसं सैरभैर झाली आहेत. परदेशातून विमानातून आलेला व्ही. आय. पी. कोरोना हळूहळू खेड्यातील बैलगाडीपर्यंत पोहोचतोय.  

कॉर्पोरेट जगतामुळे सामान्यांपासून अतिसामान्य आणि सधन असणाºया सर्वांनाच शहराचं तसं विलक्षण आकर्षण. दिल्ली, मुंबई, कोलकात्ता, चेन्नई, पुणे, नागपूर, औरंगाबादपासून ते सोलापूर शहरातील दाट लोकसंख्या त्याचंच कारण. दाट लोकसंख्येला राहायला जागा कमी पडायला लागली म्हणूनच शहरात जशा झोपडपट्ट्या उभ्या राहिल्या तशा चाळीस मजल्यापर्यंतच्या गगनचुंबी इमारतीही उभ्या राहिल्या. या इमारतीत अन् झोपडपट्ट्यात कितीतरी माणसं राहतात. खुराड्यात कोंबड्या अन् गोठ्यात शेळ्या,मेंढ्या कोंडाव्यात तशी माणसांची गर्दी मोठमोठ्या शहरातून दिसून येतेय. 

ही गर्दी म्हणजे कोरोनाचं कुरण. जेवढी गर्दी जास्त तेवढी माणसं एकमेकांना भेटतात.कोरोना संसर्ग बाधित कोण हे कुणालाही माहिती असत नाही. शासकीय रुग्णालयात भरती केल्यानंतरच कळतं की ‘आमका अन् तमका’बाधित आहे. त्यानं चौकशीत तोंड उघडेपर्यंत संपर्कातील लोकांची भंबेरी उडते. कुठे आपण संपर्कात आलो की काय? अशी शंका मनात येते अन् झोप उडून जाते.      

  सोलापूरसारख्या स्मार्ट शहराच्या महापौर देखील संसर्ग बाधित झाल्याच्या बातम्या वाचल्यावर तर धडकी भरल्याशिवाय राहत नाही. राज्याचे विद्यमान मंत्री अन् माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हेही सुरक्षित राहू शकत नाहीत ही मोठी खेदाची बाब आहे. ज्यांनी जनतेची काळजी घ्यायची तेच रुग्णालयात दाखल झाले तर सामान्य जणांनी जगायचं कुणाच्या भरवशावर.    

  शासकीय रुग्णालयात गंभीर संसर्ग बाधित रुग्णांना दाखल करून घेण्याची सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाची क्षमता संपली आहे. गोरगरीब गंभीर रुग्ण आला तर त्याला‘वरतीच’ दाखल होण्याशिवाय पर्याय उरणार नाही. सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. औदुंबर मस्के हे टाहो फोडून सांगत आहेत. म्हणून ‘लोकमत’ म्हणतोय ‘परिस्थिती हाताबाहेर गेलीय, सोलापूरला वाचवा!’            

  सामान्यजनहो आवरा स्वत:ला, सावरा कुटुंबाला अन् मानवजातीला. डॉक्टरांनी फोडलेला आर्त टाहो काळीज पिळवटून टाकणारा आहे. शासकीय रुग्णालयात बेड रिकामे नाहीत तर खासगी रुग्णालयाची कवाडे बंद आहेत. शासनाने कारवाईचा बडगा उगारूनही गबरगंड अन् धनदांडगी रुग्णालये घाबरायला तयार नाहीत. सोलापूरच्या काही रुग्णालयातील ‘बनवाबनवी’ चालू असून शासनाच्या अन् जनतेच्या डोळ्यात धूळफेक टाकण्याचा प्रयत्न करताना ते दिसून येतात.

पुण्या, मुंबईची परिस्थिती तर विचारूच नका. सर्वच शहरात माणसांचा जीव कोंडून चाललाय, श्वास गुदमरायला लागलाय. म्हणून आज ओस पडणारी खेडी गजबजायला लागलीत. खेड्यापाड्यात  नोकरी करणारा चाकरमानी शहरात अन्  तालुक्याच्या ठिकाणी जाऊन राहायचा. आज तोही खेड्याला पसंती देतोय. त्यामुळे खेडी निश्चितच स्वावलंबी होतील. खेडी स्वयंपूर्ण होण्यासाठी गांधीजीनीही सांगून ठेवलंय ‘खेड्याकडे  चला’. जातीपातीला मूठमाती द्यायची असेल तर शहराकडे चला असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे. कोरोनाने धास्तावलेले सामान्यजण आज म्हणायला  लागलेत नको ते शहराचं आकर्षण, नको ते कॉर्पोरेट जग. ‘नको तो डामडौल, नको तो मॉल-राहूया स्मॉल’. म्हणूनच खेड्यातून शहरात आलेला आता घाबरलेला अन् गोंधळलेला माणूस म्हणतोय ‘गड्या आपुला गाव बरा.’- अण्णासाहेब भालशंकर(लेखक शिक्षण अन् सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.)

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या