- सचिन कांबळे
पंढरपूर- अनेक दिवसापासून प्रतिक्षेत असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या सहअध्यक्षपदी गहीणीनाथ महाराज औसेकर यांची निवड झाली आहे. त्याचबरोबर मंदिर समितीच्या नव्या सहा सदस्यांची निवड करण्यात आली आहे.२०१७ रोजी अध्यक्षांसह ९ सदस्यांचा स्थापना करण्यात आली होती. यामध्ये अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, सदस्य रामचंद्र कदम, शकुंतला नडगिरे, दिनेशकुमार कदम, सचिन अधटराव, भास्करगिरी गरु किसनगिरी बाबा, गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर, संभाजी शिंदे, पदसिध्द साधना भोसले यांची निवड करण्यात आली होती.
पंढरपूर मंदिरे (सुधारणा) अधिनियम, २०१७ (२०१८ चा महा.२) याच्या कलम २ च्या पोट-कलम (१) च्या खंड (अ) द्वारे, समितीच्या सह-अध्यक्षाची तरतूद करण्यासाठी उक्त अधिनियमात सुधारणा करण्यात आली आहे. पंढरपूर मंदिरे (सुधारणा) अधिनियम, २०१८ (२०१८ चा महा. २३) द्वारे उक्त अधिनियमाच्या कलम २ च्या पोट कलम (१) आणि त्याच्या खंड (अ) यात समितीच्या सदस्यांची एकूण संख्या बारावरुन पंधरा इतकी वाढविण्यासाठी आणि सदस्यांची संख्या नऊ वरुन चौदा इतकी करण्यासाठी, सुधारणा करण्यात आली आहे.मंदिर समितीच्या सदस्यपदी ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, माधवी निगाडे, अतुल भगरे, शिवाजीराव मोरे, प्रकाश महाराज जवजांळ, आ. सुजितसिंह ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे.मंदिर समितीचे सहअध्यक्षपद वारकरी प्रतिनीधी असावा अशी मागणी वारकºयांमधून होत होती. यामुळेच गहीणीनाथ महाराज औसेकर यांची निवड झाली असेल.
हे नवे पदाधिकारी
सहअध्यक्ष - गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर
विधान परिषद सदस्य - सुजितसिंंह मानसिंह ठाकूर
सदस्य - ह.भ.प. ज्ञानेश्वर नामदेव देशमुख (जळगांवकर)
सदस्य - अॅड. माधवी श्रीरंग निगडे
सदस्य - प्रकाश रुस्तुमराव जवंजाळ
सदस्य - भागवतभुषण अतुलशास्त्री अशोकराव भगरे
सदस्य - ह.भ.प. शिवाजीराव मारे