आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १९ : सोलापूर जिल्ह्यात शिवजयंतीचा उत्साह शिगेला पोहचला असतानाच सांगोला शहरातील भीमनगर येथे शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर काही समाजकंटकांनी दगडफेक केली़ या दगडफेकीत पोलीसांच्या गाड्यांसह इतर १२ गाड्यांचे नुकसान झाले आहे़ शिवाय मिरवणुकीत काही शिवभक्त जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे़ शिवजयंती मिरवणूक दरम्यान काही समाजकंटकानी भीमनगर येथे दगडफेक केल्यानंतर वातावरण तणावपूर्ण झाले़ या घटनेची गंभीर दखल घेवून पोलीस स्टेशन व शांतता कमिटीची भीमनगर येथे बैठक झाली़ यावेळी आ. गणपतराव देशमुख माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील, माजी आमदार शहाजीबापू पाटील व दलित बांधवांनी शांततेचे आवाहन केले़ पोलीसांनी दोषींवर कडक कारवाई करावी अशा सक्ती सूचना या शांतता बैठकीत करण्यात आल्या़ या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधिक्षक डॉ. विरेश प्रभू, अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे, सांगोला पोलीसांनी स्टेशन येथे ठाण मांडून आहेत़ शहरातील घडामोडीवर लक्ष्य ठेवण्यात येत आहेत शहरात तणावपूर्ण शांतता आहे
शिवजयंतीला सांगोल्यात गालबोट, समाजकंटाकडून मिरवणुकीवर दगडफेक, दोन पोलीस गाड्यांसह बारा वाहनांचे नुकसान, शिवभक्त जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 6:00 PM
सोलापूर जिल्ह्यात शिवजयंतीचा उत्साह शिगेला पोहचला असतानाच सांगोला शहरातील भीमनगर येथे शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर काही समाजकंटकांनी दगडफेक केली़
ठळक मुद्देशिवजयंती मिरवणूक दरम्यान काही समाजकंटकानी भीमनगर येथे दगडफेक केल्यानंतर वातावरण तणावपूर्णग्रामीण पोलीसांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळावरशांतता कमिटीच्या बैठकीतून शांतता राखण्याचे आवाहन