आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ५ : अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी हे गुजरात येथील पूरग्रस्त नागरिकांच्या भेटीसाठी गेलेले असता त्यावेळी भाजपच्या कार्यकत्यार्नी राहुल गांधी यांच्या ताफ्यावर दगडफेक करून हल्ला केला. याचा निषेध करण्यासाठी आज रोजी सोलापूर शहर युवक काँग्रेस व सोलापूर जिल्हा ठरवक विद्यार्थी संघटनेच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोदी, शहा, भाजपच्या नावाचे धोंडे दाखवून या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी मोदी, व भाजप सरकारच्या धिक्काराच्या जोर जोरात घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी शहर अध्यक्ष सुधीर खरटमल, माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष संयोजक अंबादास बाबा करगुळे, सोलापूर जिल्हा ठरवक अध्यक्ष संयोजक गणेश डोंगरे, प्रदेश युवक सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले, प्रदेश सरचिटणीस राहुल वर्धा, अर्जुन साळवे, विवेक कन्ना, गौरव खरात, तिरुपती परकीपंडला, महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर आदी प्रमुख उपस्थित होते.यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की, राहुलजी गांधी हे गुजरात मधील पूरग्रस्तांना भेटायला गेले असता भाजप कार्यकत्यार्नी जो भ्याड हल्ल्या केला त्याचा आम्ही निषेध करीत आहोत. भाजप सत्तेवर आल्यापासून विरोधकांचा आवाज वारंवार दाबण्याचा प्रयत्न भाजप सरकार करीत आहे. येणाºया गुजरात,आणि हिमाचल प्रदेश निवडणूकित भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे काँग्रेस वर दबाव टाकण्यासाठी हा भ्याड हल्ला करण्यात आला. साम, दाम, दंड, भेद, गुंडगिरी अश्या कोणत्याही मागार्चा वापर करून सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न भाजप सरकार करीत आहे. अशाच प्रकारे गुजरात मधील आमदारांवर बेकायदेशीर धाड टाकण्यात आली. अशा प्रकारे विरोधकांवर दबाव टाकण्याचा मोदी, भाजप सरकार प्रयत्न करीत आहे. काँग्रेसने या देशासाठी आजपर्यंत बलिदान दिले आहे अश्या या कोणत्याही दबावाचा , हल्ल्याचा आमच्यावर काहीही परिणाम होणार नाही उलट भाजपच्या हीन, आणि खालच्या पातळीच्या राजकारणाचा आम्ही त्वेषाने विरोध करू, आत्ता आम्ही गप्प बसणार नाही असे आमदार प्रणिती शिंदे म्हणाले.या निषेध आंदोलनात सैफन शेख, सुभाष वाघमारे, संतोष अट्टेलुर, राजासाब शेख, संजय गायकवाड, गोविंद कांबळे, हर्षवर्धन कमटम, प्रतीक शिंगे, श्रीकांत वाडेकर, सोहेल पठाण, पंडित सातपुते, युवराज जाधव, सौरभ साळुंखे, शुभम माने, मनोज अधटराव, सचिन शिंदे, गौरव बनसोडे, अमित शेख, सुमन जाधव, दाऊद नदाफ, गणेश गायकवाड, हैदर मुजावर, साई करगुळे, यल्लपा तुपदोलकर, श्रीकांत गायकवाड, राहुल गोयल, प्रवीण जाधव, अतुल कांबळे, एजाज बागवान, शरद गुमटे, दिनेश डोंगरे, अश्फाक बागवान, भिक्षापती परकीपंडला, सिद्धांत रंगापुरे, अजय जाधव, धनंजय ढवळे, शहाजी खांडेकर, विजय कोप्पद, सागर म्हेत्रे, बबलू मंजुळकर, श्रीनिवास परकीपंडला, गणेश साळुंखे, मुमताज तांबोळी, शोभाताई बोबे, वीणाताई देवकते, प्रमिला तुपळवंडे, बसू कोळी, पिंटू माने, राज पवार, अभिजित, महेश गायकवाड, आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्ठया संख्येने उपस्थित होते.
मोदी, शहा, भाजपच्या नावाचे धोंडे दाखवून सोलापूरात राहुल गांधी यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 7:20 PM
सोलापूर दि ५ : अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी हे गुजरात येथील पूरग्रस्त नागरिकांच्या भेटीसाठी गेलेले असता त्यावेळी भाजपच्या कार्यकत्यार्नी राहुल गांधी यांच्या ताफ्यावर दगडफेक करून हल्ला केला. याचा निषेध करण्यासाठी आज रोजी सोलापूर शहर युवक काँग्रेस व सोलापूर जिल्हा ठरवक विद्यार्थी संघटनेच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोदी, शहा, भाजपच्या नावाचे धोंडे दाखवून या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी मोदी, व भाजप सरकारच्या धिक्काराच्या जोर जोरात घोषणाबाजी करण्यात आली.
ठळक मुद्देमोदी, व भाजप सरकारच्या धिक्काराच्या जोर जोरात घोषणाबाजीधोंडे दाखवून या भ्याड हल्ल्याचा निषेधविरोधकांचा आवाज वारंवार दाबण्याचा प्रयत्न भाजप सरकार करीत आहे - प्रणिती शिंदे