सोलापूर : छत्रपती संभाजी महाराज चौका जवळील हॉटेलच्या बाजूला असलेल्या पार्किंगमध्ये केमीकल पासून तयार केलेले बेकायदा डिझेल विक्री करणाऱ्या टोळीला जेरबंद केले आहे. १७ कोटी २० लाख ९० हजार रूपयाचा माल हस्तगत करण्यात आला आहे. नऊ जणांना अटक झाली आहे.
तानाजी कालादास ताटे (रा. मानेगाव ता. बार्शी), युवराज प्रकाश प्रबळकर (रा. पंचशील नगर, वैराग ता. बार्शी), अविनाश सदाशिव गंजे (रा. भवानी पेठ, चडचणकर अपार्टमेंट सोलापूर), सुधाकर सदाशिव गंजे (रा. आवंती नगर), श्रीनिवास लक्ष्मण चव्हाण (रा. अभिषेक नगर), हाजु लतीफ शेख (रा. कौडगाव जि. उस्मानाबाद), हिमांशु संजय भुमकर (वय २१ रा. भुमकर कॉलनी, बार्शी रोड, वैराग बार्शी) व अन्य दोघे (रा. खुपरी ता. वाड जि. पालघर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हॉटेलच्या बाजूला असलेल्या पार्किंगमध्ये बेकायदा केमीकल निर्मित डिझेल विक्री होत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी दि.१४ ऑक्टोंबर रोजी धाड टाकली, तेव्हां तेथे डिझेल सारखा ज्वलनशील द्रव्य टॅंकर (क्र.एमएच २५ एके २४१७) मधून लक्झरी बस (क्र.एनएल ०१ बी १६८७) मध्ये भरताना आढळून आला. घटनास्थळावरून एक कोटी एक लाख रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
केमीकल डिझेलचे कनेक्शन पालघरशी
- टॅंकर हिमांशु भुमकर याची असल्याचे समजले, तपास केला असता केमीकल डिझेल खुपरी ता. वाडा जिल्हा पालघर येथील ओम पेट्रो स्पेसिलीटीज लि. येथून येत असल्याची माहिती आली. गुन्हे शाखेचे दोन पथके पालघर येथे रवाना झाले. तेथे एका कंपनीत केमीकलच्या सहायाने डिझेल तयार होत असताना आढळून आले. कंपनीची मशिनरी, मालमत्ता व जमीन असा एकूण १७ कोटी १९ लाख ९० हजाराचा मुद्देमाल सील करून हस्तगत करण्यात आला.
गुन्हे शाखेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी केली कारवाई
- ही कामगिरी पोलीस आयुक्त हरिष बैजल, पोलीस उपायुक्त बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय साळूंखे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन बंडगर, नंदकिशोर सोळूंके, श्रीनाथ महाडिक, फौजदार संदीप शिंदे, अमंलदार सुहास आखाडे, दिलीप किर्दक, अशोक लोखंडे, अमित रावडे, इमाम इनामदार, अजय अडगळे, अजय पाडवी, संतोष मोरे, अंकुश भोसले, संतोष फुटाणे, संदीप जावळे, विजयकुमार वाळके, राजेश चव्हाण, श्रीकांत पवार, अनिल जाधव, शितल शिवशरण, सचिन बाबर, विनायक बर्डे, राहूल ताेगे, कृष्णात कोळी, महेश शिंदे, तात्यासाहेब पाटील, शंकर मुळे, विद्यासागर मोहिते, कुमार शेळके, राजकुमार पवार, अजिंक्य माने, गणेश शिंदे, उमेश सावंत, राजू मुदगल, सुहास अर्जून, निलेश शिरूर, अजय गुंड, सनी राठोड, रणजित परिहार व चालक ठोकळ, गुंड, काकडे यांनी पार पाडली.
सहाजणांना तीन तर तिघांना चार दिवसाची पोलीस कोठडी
- या प्रकरणी तानाजी ताटे, युवराज प्रबळकर, अविनाश गंजे, सुधाकर गंजे, श्रीनिवास चव्हाण, हाजू शेख यांना तीन दिवसाची पोलीस काेठडी देण्यात आली होती. पुन्हा न्यायालयासमारे उभ केले असता न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. हिमांशु भुमकर व अन्य पालघरच्या दोघांना पुन्हा चार दिवसाची पोलीस काेठडी देण्यात आली आहे.