पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात २१ मे रोजी भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा नोंदला होता. याबाबत तपास करताना डीबीच्या पथकास पंढरपूर शहरातील एका व्यक्तीने हा गुन्हा केल्याचा संशय आला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. यावेळी त्याने वेगवेगळ्या मित्रांसह गाड्या चोरल्या व विक्री केल्याचे समोर आले. जप्त केलेल्या ४६ मोटारसायकली पंढरपूर शहर व सातारा, सांगली, कोल्हापूर, पूणे, सोलापूर, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांतील आहेत.
या प्रकरणी नामदेव बबन चुनाडे (रा. पंढरपूर), विश्वास ढगे (रा. घानंद,जि. सांगली), अतुल जाधव (रा. भक्तिमार्ग, पंढरपूर), शकील बंदेनवाज शेख (रा. नातेपुते), अभिमान ऊर्फ आबा खिलारे (रा. मोरोची, ता. माळशिरस) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. यातील नामदेव चुनाडे फरार आहे तर इतर चौघांना अटक केली आहे.
ही कामगिरी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि राजेंद्र मगदुम, हवालदार शरद कदम, बिपीनचंद्र ढेरे, सूरज हेंबाडे, राजेश गोसावी, इरफान मुलाणी, पोलीस शोएब पठाण, इरफान शेख, महेश पवार, संजय गुटाळ, प्रसाद औटी, सुनील बनसोडे, सुजित जाधव, समाधान माने, सुजित उबाळे, विनोद पाटील, अन्वर आतार (सायबर पोलीस ठाणे) यांनी केली. पुढील तपास हवालदार सूरज हेंबाडे, बिपीनचंद्र ढेरे, पोलीस शोएब पठाण, महेश पवार करीत आहेत.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पो.नि. अरुण पवार, पो.नि. किरण अवचर, पो.नि. प्रशांत भस्मे, स.पो.नि. राजेंद्र मगदुम, सपोनि एम. एन. जगदाळे व उपपो.नि. प्रशांत भागवत उपस्थित होते.
नातेपुते घाटात एसटी अडवून दरोडा टाकणारा पकडला
अभिमान ऊर्फ आबा अर्जुन खिलारे (रा. मोरोची, ता. माळशिरस) याच्याविरुद्ध जबरी चोरी, दरोडा, बलात्कार, अग्निशस्त्र जवळ बाळगणे अशा प्रकारचे गुन्हे फलटण, नातेपुते, माळशिरस, इंदापूर या पोलीस ठाण्यांत दाखल आहेत. तो सध्या माळशिरस पोलीस ठाण्याकडील दरोड्याच्या गुन्ह्यात फरार होता. त्याला पंढरपूर पोलिसांनी अटक केल्याचे सपोनि राजेंद्र मगदूम यांनी सांगितले.
----
फोटो
जप्त केलेल्या मोटारसायकलींसह जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पो.नि. अरुण पवार, पो.नि. किरण अवचर, पो.नि. प्रशांत भस्मे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स.पो.नि. राजेंद्र मगदुम.