करमाळ्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे गाºहाणं :सेनेच्या समारंभात विजयदादा; बबनदादांचंही सहकार्य नाही,  संजयमामांची तर वेगळीच टीम.. सांगा, आम्ही काय करायचं ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 12:55 PM2019-02-01T12:55:53+5:302019-02-01T12:59:08+5:30

करमाळा : शिवसेना आमदारांच्या उद्घाटन समारंभास खा. विजयदादा येतात, तर करमाळा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कुर्डूवाडी भागात आ. बबनदादा ...

Gangadhar of NCP workers in Karamala: Vijayadada at the Army's inauguration; There is no co-operation with the Bahubanadas, Sanjayamam's other team .. Tell us, what do we do? | करमाळ्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे गाºहाणं :सेनेच्या समारंभात विजयदादा; बबनदादांचंही सहकार्य नाही,  संजयमामांची तर वेगळीच टीम.. सांगा, आम्ही काय करायचं ?

करमाळ्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे गाºहाणं :सेनेच्या समारंभात विजयदादा; बबनदादांचंही सहकार्य नाही,  संजयमामांची तर वेगळीच टीम.. सांगा, आम्ही काय करायचं ?

Next
ठळक मुद्देराष्ट्रवादीची परिवर्तन यात्रा बुधवारी उशिरा रात्री करमाळ्यात दाखलप्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ परिवर्तन यात्रेबरोबर करमाळ्यात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे सकाळी करमाळ्यात थेट दाखल

करमाळा : शिवसेना आमदारांच्या उद्घाटन समारंभास खा. विजयदादा येतात, तर करमाळा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कुर्डूवाडी भागात आ. बबनदादा सहकार्य करीत नाहीत. संजयमामांची वेगळीच टीम कार्यरत आहे. सांगा, आम्ही काय करायचे? असे गाºहाणे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर पदाधिकाºयांनी मांडले. त्यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ‘तुम्ही काम करा.. मी पाहून घेतो,’ एवढेच उत्तर दिले.

राष्ट्रवादीची परिवर्तन यात्रा बुधवारी रात्री उशिरा करमाळ्यात दाखल झाली. गुरुवारी सकाळी माजी आ. शामलताई बागल यांच्या निवासस्थानासमोर राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संवाद साधला. तळागाळातील मतदारांशी थेट संपर्क ठेवायचा असेल तर बुथ कमिट्या स्थापन करा. राष्ट्रवादीच्या युवक, अल्पसंख्याक, महिला, ओबीसी सेलच्या पदाधिकाºयांना समक्ष बोलावून ‘तुम्ही आजपर्यंत कसे काम केले, असा प्रश्न करून लोकसभा व विधानसभा निवडणुका एकाचवेळी होण्याची शक्यता गृहीत धरून तळागाळात जाऊन कामाला लागा, असा आदेश जयंत पाटील यांनी दिला.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खा. विजयसिंह मोहिते-पाटील हे शिवसेना आमदार नारायण पाटील यांच्या कार्यक्रमास जातात. त्यांना मदत करतात. माढा तालुक्यात कुर्डूवाडी भागात आ. बबनराव शिंदे पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमास सहकार्य करीत नाहीत व जिल्हा परिषद अध्यक्ष संजय श्ािंदे यांची वेगळीच टीम कार्यरत आहे, असा तक्रारींचा सूर लावताच रश्मी बागल यांनी कार्यकर्त्यांना रोखले. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बबनदादा शिंदे यांची तशी मानसिकता आता राहिलेली नाही.

तुुम्ही सर्व जण काम करा, काय ते मी पाहून घेतो, असे सांगितले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, उमेश पाटील, रोहित पवार, विजय कोलते, रश्मी बागल, दिग्विजय बागल, विलासराव घुमरे, आदिनाथचे अध्यक्ष संतोष पाटील, बाजार समितीचे सभापती शिवाजी बंडगर, उपसभापती चिंतामणी जगताप, सुभाष गुळवे, तालुकाध्यक्ष सतीश नीळ, महिलाध्यक्ष साधना खरात, शहराध्यक्ष अभिषेक आव्हाड, गणेश झोळ, श्रीकांत चेंडगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

....तर जयवंतराव जगताप यांना निवडून आणू
- मकाई कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी बोलताना सांगितले की, विजयदादांची भावना चांगलीच आहे. त्यांचे स्थानिक नेते व कार्यकर्ते रश्मी बागल यांना नेता मानत नसल्याने पराभव झाला. असो. पराभवाचा दोष कुणाला देता येणार नाही. आम्ही पक्षाशी प्रामाणिक असून, पक्ष ज्या कोणाला उमेदवारी देईल, त्यांचा प्रचार करू. पक्षाने जयवंतराव जगताप यांना उमेदवारी दिली तरी त्यांचा प्रचार करून निवडून आणू, असे स्पष्टपणे दिग्विजय बागल यांनी सांगितले.

अजित पवार बारामतीत.. रोहितने केले करमाळ्याचे नेतृत्व

  • - राष्ट्रवादीची परिवर्तन यात्रा बुधवारी उशिरा रात्री करमाळ्यात दाखल.
  • - प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ परिवर्तन यात्रेबरोबर करमाळ्यात आले, करमाळा पॅलेसमध्ये मुक्काम केला.
  • - विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे सकाळी करमाळ्यात थेट दाखल झाले तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रात्रीच बारामती गाठली. ते करमाळ्यात आलेच नाहीत. प्रतिनिधी म्हणून पुतण्या रोहित पवारांना पाठविले.

Web Title: Gangadhar of NCP workers in Karamala: Vijayadada at the Army's inauguration; There is no co-operation with the Bahubanadas, Sanjayamam's other team .. Tell us, what do we do?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.