कुसळंब : बार्शी तालुक्यातील जामगाव (आ.) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गंगूबाई शिवाजी जगताप, तर उपसरपंचपदी विष्णू आवटे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संभाजी दिगंबर माने यांनी काम पाहिले.
नऊ सदस्य असलेल्या जामगाव ग्रामपंचायत निवडणुकीत बाळासाहेब जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून बिनविरोध निवड झाली. सरपंचपदासाठी गंगूबाई जगताप व उपसरपंचपदासाठी विष्णू आवटे यांचे प्रत्येकी एकेक अर्ज आला. या सभेचे प्रोसिडिंग वाचन ग्रामसेवक आर. एन. माळवे यांनी केले. निवडणूक सहायक म्हणून तलाठी के. बी. राठोड यांनी काम पाहिले.
याप्रसंगी नूतन ग्रामपंचायत सदस्या अनुराधा बालाजी कागदे, गंगूबाई जगताप, प्रियंका गडदे, शीतल अडसूळ, विष्णू आवटे, बाळू जाधव, अमर ठोंबरे, प्रकाश आडसूळ, ज्येष्ठ मंडळी, विठ्ठल चित्राव, विजय आवटे, बबन गडदे, बाळासाहेब जगताप, बजरंग कुरळे, विशाल खंडागळे, तुकाराम गडदे, बालाजी कागदे, अफसर मुलानी, सतीश खंडागळे, अमोल आवटे, राजेंद्र गडदे, गोविंद गडदे, भगवान इंगळे, बजरंग ठोंबरे, बापू ठोंबरे, अमर कागदे, प्रशांत पाटील, तुषार गडदे, ऋषी आवटे उपस्थित होते.
----
२८ जामगाव
जामगावच्या सरपंच, उपसरपंच निवडीनंतर गावकारभाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.