येथील नगर परिषदेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सन २०१८ मध्ये सहभाग घेतला असून, या बरोबरच ‘माझी वसुंधरा’ हे अभियानही प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. यामुळे शहरातील सन २०१० च्या दरम्यान कचऱ्याचे प्रमाण प्रतिदिन सुमारे १० टन होते ते आता ४ टनावर आले आहे. त्यामुळे भविष्यात शहराचे हेच प्रमाण शून्यावर आणून ‘शहर कचरामुक्त' करण्याचा संकल्प नगर परिषदेने केल्याची आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण यांनी दिली.
शहरात एकूण १७ प्रभाग व ५ असेसमेंट वाॅर्ड असून २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या २२ हजारांहून अधिक आहे. येथील ४६ घरातून दररोज ४ टन कचरा गोळा केला होतो. यासाठी ६५ कर्मचारी आहेत. यात टेंडरद्वारे कंत्राटी ३५ व कायमस्वरूपी ३० आरोग्य कर्मचारी आहेत. याबरोबरच शहरातील कचरा उचलण्यासाठी ५ घंटागाड्या, १ डम्पर, व १ ट्रॅक्टर कार्यरत आहे. त्यांच्या साहाय्यानेच संपूर्ण कचरा गोळा केला जात आहे.
शहरातील गोळा केलेल्या कचराऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यासाठी कुर्डूवाडीबाहेर तडवळे गावाच्या हद्दीतील नगर परिषदेच्या कचरा डेपोत तो पहिल्यांदा टाकण्यात येतो. नंतर तिथे ओल्या कचराऱ्यासाठी २४ कंपोस्ट गांडूळ पीट तयार केले आहेत. सुक्या कचराऱ्यासाठी ८, बांधकाम, पाडकाम कचऱ्यासाठी ८, व मैला व सांडपाण्यासाठी, अविघटनशील कचऱ्यासाठी वेगवेगळी विल्हेवाटीची व्यवस्था केलेली आहे. यामुळे लवकरच शहर योग्य नियोजनाने कचरा मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यास शहरातील नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहनही पायगण यांनी केले आहे.
----
कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी घरी देणार गांडूळ कीट
कुर्डूवाडी शहराला कचरामुक्त करण्यासाठी नगराध्यक्ष समीर मुलाणी, मुख्याधिकारी समीर भूमकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग काम करीत आहे. त्यासाठी शहरातील ओल्या कचऱ्याची घरच्या घरी विल्हेवाट लावण्यात यावी यासाठी प्रत्येकाच्या घरोघरी लहान कुटुंबाला ५० केजी व मोठ्या कुटुंबातील व मोठ्या व्यावसायिकांना १०० केजीचे जिवंत गांडूळ असलेले कीट भविष्यात देण्यात येणार असून, यामुळे शहरातील दोन टन कचऱ्यावची घरच्या घरी विल्हेवाट लावण्यात येईल व सुका कचरा गोळा करण्यासाठी नगर परिषदेच्यावतीने अधिकृत ओळखपत्र देऊन कर्मचारी नेमून काम केले जाईल असेही त्यांनी सांगितले.
...................
फोटो-