शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

सोलापूर शहराच्या मानवी वसाहतीतच गॅस‘बॉम्ब’; सोलापूरकरांच्या जीविताला धोक्याची घंटा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 2:19 PM

रेवणसिद्ध जवळेकर सोलापूर : गॅस अन् रॉकेलचा कधी, केव्हा भडका उडेल याचा काही नेम नाही. शहरात याआधी अशा दुर्घटना ...

ठळक मुद्दे‘लोकमत’ चमूने आॅन दी स्पॉट रिपोर्टिंग करताना मिनी गॅसपंपचा गोरखधंदा उघडल्याचे निदर्शनास आलेदिवसभर ते रात्री उशिरापर्यंत हा गोरखधंदा चालत असल्याच्या प्रकाराला रहिवाशांनीही दुजोरा दिला

रेवणसिद्ध जवळेकर

सोलापूर : गॅस अन् रॉकेलचा कधी, केव्हा भडका उडेल याचा काही नेम नाही. शहरात याआधी अशा दुर्घटना घडलेल्या असतानाही शहरातील मानवी वसाहतीतच ‘गॅस बॉम्ब’ अर्थातच मिनी गॅसपंप खुलेआम चालत असल्याचे ज्या-त्या भागातील जागरुक रहिवाशांनी ‘लोकमत’शी बोलताना पोलीस अन् पुरवठा विभाग मूग गिळून गप्प बसतोय, असा आरोपही केला. आमच्या जीविताला हे गॅस बॉम्ब जणू धोक्याचीच घंटी असल्याची भीतीही व्यक्त करताना त्यांच्या चेहºयावर तसा भावही दिसत होता. 

रविवारी दुपारी ‘लोकमत’ चमूने आॅन दी स्पॉट रिपोर्टिंग करताना मिनी गॅसपंपचा गोरखधंदा उघडल्याचे निदर्शनास आले. दिवसभर ते रात्री उशिरापर्यंत हा गोरखधंदा चालत असल्याच्या प्रकाराला रहिवाशांनीही दुजोरा दिला. ‘लोकमत’ चमू रविवारी दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी राजेंद्र चौकात पोहोचला. तेथील बसवेश्वर हॉस्पिटलच्या उत्तर दिशेकडून जाणारा एक रस्ता आहे. या रस्त्यावरच अगदी छोट्याशा टपरीत एक गॅसटाकी उलटी ठेवण्यात आली होती. जवळच एका रांगेत सहा घरगुती गॅस सिलेंडर ठेवण्यात आले होते. त्यापैकी एक टाकीही उलटी करुन ठेवण्यात आली होती. या टाक्यांजवळ पाण्याचा एक जारही ठेवण्यात आला होता. १२ वाजून १७ मिनिटांनी हे चित्र चमूने कॅमेºयात बंदिस्त केले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत एकापाठोपाठ एक अशा तीन-चार रिक्षा तेथे दाखल झाल्या.

हॉस्पिटलच्या याच दिशेला बसवेश्वर मेडिकल शॉप आहे. तेथून हाकेच्या अंतरावर संजीवनी नर्सिंग होम आणि लगतच कोचिंग क्लासेस आहे. रिक्षांमध्ये घरगुती गॅस भरण्यासाठी आलेल्या चालकांमुळे बसवेश्वर हॉस्पिटलकडील रस्ताच ठप्प झाला. मेडिकल दुकानात औषधे, गोळ्या घेण्यासाठी आलेल्यांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्रही आॅन दी स्पॉट रिपोर्टिंग करताना प्रखरपणे जाणवले. त्या भागातील काही रहिवाशांना बोलते केले असता त्यांनी ‘साहेब, हे रोजचेच आहे.

रिक्षात गॅस भरताना एखादा स्फोट होण्याची वाट पोलीस पाहणार आहे का ?’ असा सवालही त्यांनी ‘लोकमत’ चमूसमोर केला. परिसरातील अनेकांना बोलते केले असता त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर अशाच प्रतिक्रिया दिल्या. राजेंद्र चौक हा परिसर नेहमी गजबजलेला असतो. परिसरात अनेक शाळा आहेत. इथल्या मिनी गॅसपंपसमोरच महापालिकेच्या परिवहन विभागाचा डेपोही आहे. चारचाकी वाहनांमध्ये गॅस भरताना जवळ कोणी सिगारेट, विडी ओढत असेल तर काय अनर्थ घडेल, याचा विचार पोलीस खात्याने करावा, असा सूर जागरुक नागरिकांमधून ऐकावयास मिळाला. जेलरोड पोलीस याकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणीही होत आहे.

मजरेवाडी शाळेजवळही गॅस बॉम्ब !- होटगी रोडवर मजरेवाडी जिल्हा परिषदेची शाळा आहे. शाळेसमोरुन नई जिंदगीकडे जाणाºया रस्त्यावर हिरव्या कापडांनी झाकोळलेली टपरी पाहावयास मिळाली. दुपारी १ वाजून २५ मिनिटांनी तेथे रिक्षात गॅस भरतानाचे चित्र दिसत होते. ती रिक्षा गेली अन् मारुती व्हॅन गॅस भरण्यासाठी दाखल झाली. या भागातील लोकांशी संवाद साधला असता त्यांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया नोंदविल्या. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी या रस्त्याने येत असताना त्यांना हा प्रकार दिसत नाही का ? असा सवाल त्यांच्या प्रतिक्रियांमधून दिसून आला. 

प्रतिकिलो ७५ रुपये दराने गॅस भरताहेत !- सोलापूर शहर आणि परिसरात काही गॅसपंप आहेत. शासनाच्या मान्यतेने उभारलेल्या या गॅसपंपांमधूनच गॅस भरणे गरजेचे असताना रिक्षांसह अन्य चारचाकी वाहनचालक बेकायदेशीर गॅस भरुन घेण्याकडे का वळत आहेत, हा प्रश्न काही रिक्षाचालकांसमोर उपस्थित केला. दोघा-तिघा रिक्षाचालकांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘साहेब, त्या गॅसपंपावर अ‍ॅव्हरेज मिळत नाही. शिवाय किलोमागचे दरही अधिक आहेत. इथे घरगुती गॅस भरुन मिळत असल्याने दरही कमी आहेत’.

घरगुती गॅस वाहनांमध्ये भरणे, याकडे पोलीस गांभीर्याने पाहतात. असे प्रकार कुठे होत असतील तर त्याचा शोध घेऊ आणि तेथील गॅस भरण्याच्या साहित्यासह संबंधितांवर कारवाई करू. गंभीर स्वरुपाचा हा गुन्हा असल्याने त्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक करीत असतात. आमचे बीट मार्शल व अन्य पथके फिरत असतात. मजरेवाडी येथील पॉइंटवर छापा घालून कारवाई करण्यात येईल.-रमेश चिंताकिंदी,सहायक पोलीस निरीक्षक (एमआयडीसी ठाण्याचा तात्पुरता पदभार)

जेलरोड हद्दीत घरगुती गॅस वाहनांमध्ये भरत असल्याचे पॉइंट शोधून काढू. त्यांच्यावर ठोस कारवाई होईलच. डी. बी. पथक आणि अन्य पथकांच्या माध्यमातून मिनी गॅसपंप उजेडात आणण्याचा कसोशीने प्रयत्न करू.-सुनील जाधव,वरिष्ठ पोलीस निरीक्षक- जेलरोड पोलीस ठाणे. 

टॅग्स :Solapurसोलापूरauto rickshawऑटो रिक्षाSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस