शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

गावठी पिस्तूल-राऊंडसह लोखंडी वाघनख्या जप्त; पंढरपूर पोलिसांची कारवाई

By दिपक दुपारगुडे | Published: March 30, 2024 8:35 PM

गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस पंढरपूर शहरात गस्त घालत असताना पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेत होते.

सोलापूर : पंढरपूर  येथील एका तरुणाकडून गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिस पथकाने एक गावठी बनावटीचे पिस्तूल, गावठी बनावटीचा राऊंड व वाघनख्या जप्त केल्या आहेत. अटक केलेल्या तरुणाचे नाव अभिजित रामा भोरे (वय २६, रा. पवार नगर, इसबावी, पंढरपूर) असे आहे.

गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस पंढरपूर शहरात गस्त घालत असताना पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेत होते. यावेळी इसबावी येथील एका हॉटेलच्या पाठीमागे एकजण त्याच्या कमरेस पिस्तूलसारखे हत्यार लावून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर तत्काळ पोलिसांनी ती माहिती पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना फोनद्वारे कळविली. त्यांच्या आदेशाने संबंधित ठिकाणाजवळ पोलिस गेले. तेथे एक इसम संशयितरित्या हॉटेलमागे सिमेंट रोडलगत येत असताना दिसला. त्याचा संशय आल्याने त्यास लागलीच गराडा घालून जागीच पकडले.त्याचे नाव अभिजित भोरे असल्याचे सांगितले. त्याची अंगझडती घेतल्यानंतर त्याच्याकडे गावठी बनावटीचा कट्टा मिळून आला. त्याच्या पॅन्टच्या डाव्या बाजूचे खिशामध्ये एक लोखंडी गावठी बनावटीचा राउंड, एक १२ बोअर रायफलचा राउंड तसेच एक लोखंडी बनावटीचे वाघनख्या मिळून आल्या. त्यानंतर त्या गावठी कट्टा व राउंड जवळ बाळगण्याचा परवाना नसताना आढळला. गावठी कट्टा, लोखंडी राउंड, १२ बोअर राउंड, वाघनख्या पोलिसांनी जप्त केल्या.

ही कारवाई पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रीतमकुमार यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश भुजबळ, सहायक फौजदार राजेश गोसावी, नागनाथ कदम, हवालदार शरद कदम, सूरज हेंबाडे, सिरमा गोडसे, बिपीनचंद्र ढेरे, नवनाथ माने, सचिन हेंबाडे, पोलिस कर्मचारी शहाजी मंडले, नीलेश कांबळे, समाधान माने, बजरंग बिचकुले, सायबर शाखेचे पोलिस अंमलदार योगेश नरळे यांनी केली आहे.

 

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी