शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

रोजगार, स्वस्त घरे मिळावीत अन् महागाई रोखावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 1:23 PM

सोलापूरकरांनी व्यक्त केल्या मोदी सरकारकडून अपेक्षा

ठळक मुद्देआता सर्वसामान्य सोलापूरकर नागरिकांनी या सरकारकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या मोदी सरकारने मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती केली पाहिजे. ज्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण झालेले नाही, त्यांना स्वस्तात घरे मिळावेमोदी सरकारच्या दुसºया कार्यकाळात विकासाचा आलेख उंचावणे आवश्यक आहे. भारत हा विकसनशील देश न राहता विकसित देश झाला पाहिजे

सोलापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने सार्वत्रिक निवडणुकीत यश मिळविल्यानंतर राष्टÑपती भवनाच्या प्रांगणातील दिमाखदार सोहळ्यात मोदी मंत्रिमंडळाचा शपथविधी समारंभ झाला. आता सर्वसामान्य सोलापूरकर नागरिकांनी या सरकारकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. मोदी सरकारने मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती केली पाहिजे. ज्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण झालेले नाही, त्यांना स्वस्तात घरे मिळावे आणि महत्त्वाचे म्हणजे महागाई कमी व्हावी, या अपेक्षा व्यक्त झाल्या.

‘लोकमत’ टीमने विविध क्षेत्रातील व्यक्तींशी यासंदर्भात संवाद साधला. यामध्ये युवक, महिला, नोकरदार आणि व्यावसायिकांचा सहभाग होता. मोदी सरकारच्या दुसºया कार्यकाळात विकासाचा आलेख उंचावणे आवश्यक आहे. भारत हा विकसनशील देश न राहता विकसित देश झाला पाहिजे. देशात गरिबीचे प्रमाण अधिक आहे. या स्थितीत स्वस्ताई निर्माण झाली पाहिजे, अशा भावना व्यक्त झाल्या.

तरुणांना नोकºया मिळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणानुसार युवकांनी मोदी यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आगामी पाच वर्षांच्या काळात बेरोजगार तरुणांना नोकºया मिळतील, त्यांना रोजगार मिळेल असे निर्णय घेणे आवश्यक आहे. तरुणांच्या हाताला काम मिळाले तरच देशाचा खºया अर्थाने विकास होणार आहे. २0२२ पर्यंत देशातील बेरोजगारीची समस्या दूर व्हावी. सरकारी सेवेत आर्थिक दुर्बलांना सामावून घेण्यात यावे. त्यांची शैक्षणिक पात्रता नाही, अशा बेरोजगारांना व्यवसाय व उद्योेग धंदा सुरू करण्यासाठी प्रशिक्षण, वित्तपुरवठा करण्यात यावा. यासाठी ग्रामीण भागात मोहीम सुरू करणे आवश्यक आहे. - जगदीश अळ्ळीमारे, शिक्षक

सर्वांसाठी घरे योजना व्हावीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २0२0 पर्यंत सर्वांसाठी घरे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या योजनेला मागील पाच वर्षांत सुरुवातही झाली आहे; मात्र अजूनही शहरी व ग्रामीण भागात बेघरांची संख्या जास्त आहे. त्यामुळे शहराच्या ठिकाणी अनधिकृत घरांची संख्या वाढत आहे. देशातील प्रत्येक कुटुंबाला त्यांचे हक्काचे घर असावे ही रास्त अपेक्षा आहे. घर बांधणे म्हणजे सर्वसामान्यांसाठी अत्यंत खर्चिक व आव्हानाची बाब आहे. त्यामुळे केंद्र शासनाने बेघर कुटुंबांना रास्त दरात घरे मिळतील, त्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण ठरेल असे काम मोदी सरकारकडून होणे अपेक्षित आहे. असे झाले तरच विकासाचा आलेख वाढणार आहे. - अविनाश वळसंगकर, व्यावसायिक

महागाई कमी व्हावी मागील पाच वर्षांत मोदी सरकारने बºयापैकी सुधारणा करून देशवासीयांना खूश करण्याचे काम केले आहे. दरम्यान, देशातील सर्वसामान्य जनता विद्यार्थी, नोकरदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात मोदी सरकारला म्हणावे तसे यश आले नाही. मोदी पर्व २ मध्ये तरी या सरकारने बेरोजगार, शेतकरी, उद्योेग वाढ, महागाई कमी करणे यावर भर द्यावा हीच मापक अपेक्षा. - अमित कामशेट्टी, व्यावसायिक 

नद्या जोड प्रकल्प करावाचवर्षानुवर्षे शेतकºयांना शेती व्यवसाय नुकसानीचा ठरत आहे. उत्त्पन्न तर सोडाच उलट दरवर्षी कर्जाचा डोंगर वाढत असल्याने शेतकºयांच्या आत्महत्या होत आहेत. त्यामुळे शेतकºयांना शाश्वत सिंचनाची व्यवस्था निर्माण करणे ही काळाची गरज झाली आहे. याच आशेवर शेतकºयांनी मोदी सरकारवर पुन्हा विश्वास दाखविला आहे. नद्या जोड प्रकल्प पूर्णत्वास आला तर शेतकºयांच्या पिढ्यानपिढ्याचा उद्धार होणार आहे; मात्र हा प्रश्न मागील अनेक राज्यकर्त्यांनी बाजूला सारला आहे. मोदी सरकारकडे शेतकºयांची ही प्रमुख मागणी असून ही एकच अपेक्षा जरी पूर्ण झालीतरी खूप मोठे काम होणार आहे. - इरेशा शेळगे, शेतकरी

बेरोजगारी हटावीयुवकांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे नोकºया मिळत नाहीत. याशिवाय जर कोणी आपला व्यवसाय सुरू करणार असेल तर त्यांना बँकेकडून सहज कर्ज उपलब्ध होत नाही. या कारणामुळे युवकांमध्ये सरकारच्या पॉलिसीबाबत नाराजी वाढत आहे. मागील पाच वर्षात काय झाले यावर विचारमंथन करण्यापेक्षा यावर्षी काय काय करावे, यावर विचारविनिमय व्हावा़ मोदी सरकारच्या दुसºया टर्ममध्ये युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न सुटावा, हीच माफक अपेक्षा़- मुनाफ शेख, विद्यार्थी

गरिबांना दिलासा मिळावाजनतेने जी सत्ता दिली आहे तो हक्क नाही तर एक जबाबदारी आहे आणि ती पार पाडली पाहिजे, या भावनेने सरकारने काम करावे. अहंकार आला आणि तुम्हीही तेच केले जे आधीच्या लोकांनी केले तर जनता तुम्हाला ज्या वेगाने वर नेले त्याच वेगाने खाली आपटेल, याचा कधीही विसर पडू देऊ नये. सर्वसामान्य जनतेबरोबरच युवक, महिलांच्या विविध अपेक्षा आहेत त्या पूर्ण करून देशातील गरीब जनतेला दिलासा द्यावा़ बेरोजगारी, शेतकºयांच्या वाढत्या आत्महत्या, दुष्काळात मदत यावर भर द्यायला हवा़- मयूर गिरे, विद्यार्थी

ग्रामीण जीवन उंचावावेराज्यातील शेतकºयांच्या नक्की काय समस्या आहेत आणि कशाने आत्महत्येला प्रवृत्त होतात ते जाणून घेऊन त्यावर त्वरित उपाययोजना करण्यात यावी. नुसत्या घोषणा नव्हे. शिवाय विविध जाती-धर्मांना आरक्षण देण्याचे आश्वासन शासनाने दिले होते, त्याची पूर्तता करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा़ बेरोजगारी, वीज समस्या, रस्ते, वाहतूक सुधारण्यावर भर देण्यात यावा़ ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होईल अशा योजना सुरू करून त्या अमलात आणाव्यात़- प्रदीप पाटील, नोकरदार 

टॅग्स :SolapurसोलापूरNarendra Modiनरेंद्र मोदीjobनोकरीHomeघरInflationमहागाई