सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मंगळवारी सांगोला पोलीस स्टेशनला भेट दिली. यावेळी त्यांनी ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत सांगोला पोलीस स्टेशन हद्दीतील महिम, महूद, लोटेवाडी, पाचेगाव बु., हातीद येथे हातभट्टी दारु तयार करणाऱ्या व्यावसायिकांसह त्यांच्या कुटुंबासमवेत बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. गावठी हातभट्टी दारू प्राशन करणाऱ्या लोकांच्या काय हाल-अपेष्टा होतात याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक सुहास जगताप उपस्थित होते. दरम्यान तेजस्वी सातपुते यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या गावात हातभट्टी तयार केली जाते अशी गावे प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याला दत्तक दिली आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुहास जगताप (महूद), सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले (महिम), सहायक पोलीस निरीक्षक नागेश यमगर (लोटेवाडी), सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब माने (हातीद), सहायक पोलीस निरीक्षक हेमंतकुमार काटकर (पाचेगाव बु.) यांना पाच गावे दत्तक दिली आहेत.
फोटो ओळ :::::::::::::
अवैध व्यावसायिक व त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधताना ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते. यावेळी मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक सुहास जगताप आदी.