मंगळवेढा येथील श्री संत बसवेश्वर यांच्या स्मारकास मान्यता मिळाली आहे. या कामासाठी यापूर्वीच्या शिवसेना-भाजप सरकारच्या कार्यकालावधीत निधीची तरतूद झाली आहे. मात्र, जागेअभावी अद्याप कामास सुरुवात करण्यात आलेली नाही. ते काम अद्यापही प्रलंबित आहे. श्री संत बसवेश्वर स्मारकाचे काम पूर्ण झाल्यास मंगळवेढा शहराचा विकास होऊन शहर व तालुक्यातील व्यापार, उद्योग वाढून बेरोजगाराच्या हाताला काम मिळणार आहे, असे शैला गोडसे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोट :::::::::::::::::
श्री संत बसवेश्वर महाराज स्मारकाचे काम त्वरित सुरू करावे अशी मागणी केलेली असतानाच श्री संत चोखोबा स्मारकासाठी पाच कोटींची तरतूद करून त्याचेही काम त्वरित सुरू करण्याबाबत नगरविकास मंत्र्यांना निवेदनाद्वारे विनंती केलेली आहे. त्यांच्याकडून निश्चितपणे विचार केला जाईल, असे वाटते.
- शैला गोडसे
जिल्हाप्रमुख, शिवसेना महिला आघाडी