शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

कोळपणीसाठी बैलजोडी मिळंना; आता सायकल कोळप्यानं आंतरमशागत उरकेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 12:12 PM

अक्कलकोट तालुक्यातील परिस्थिती; दमदार पावसामुळे खरिपातील पिके जोमात

ठळक मुद्देआंतरमशागत करण्यासाठी बैलजोड्यांचीच आवश्यकता असते़ ट्रॅक्टरद्वारे आंतरमशागत करता येत नाहीसध्या बैलजोड्यांची संख्या कमी झाली आहे़ शिवाय सर्वच  शेतकºयांना बैलजोडी वेळेवर उपलब्ध होत नाहीतअक्कलकोट तालुक्यातील शेतकरी आंतरमशागतीसाठी सायकल कोळप्याचा वापर करताना दिसतात

अक्कलकोट : यंदा वेळेवर पाऊस झाल्यामुळे शेतकºयांनी ट्रॅक्टरद्वारे झटपट पेरणी केली; मात्र आता आंतरमशागत करण्यासाठी बैलजोडी मिळेना झाली़ अखेर सायकल कोळप्यानंच कोळपणी सुरू केली असून ती उरकेना, असे शेतकºयांनी सांगितले़. 

यंदा वेळेवर पाऊस झाल्यामुळे प्रथमच जून महिन्यात खरिपातील उडीद, तूर, मूग, भुईमूगसह अन्य प्रकारच्या पिकांची पेरणी केली. क्षेत्र जास्त आणि बैलजोड्यांची संख्या कमी यामुळे शेतकºयांनी झटपट पेरणी उरकण्यासाठी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात वापर केला़ खरीप हंगामातील पेरणी वेळेवर झाली़ प्रत्येक नक्षत्रात पाऊसही पडत गेला़ त्यामुळे पेरणी केल्यानंतर पिकांची उगवण चांगली झाली आहे; मात्र पावसामुळे आता या पिकांत तण वाढलेले आहे. त्यामुळे आंतरमशागत करण्यासाठी बैलजोड्यांचीच आवश्यकता असते़ ट्रॅक्टरद्वारे आंतरमशागत करता येत नाही.

सध्या बैलजोड्यांची संख्या कमी झाली आहे़ शिवाय सर्वच  शेतकºयांना बैलजोडी वेळेवर उपलब्ध होत नाहीत़ मात्र तण वाढत असल्याने अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी आंतरमशागतीसाठी सायकल कोळप्याचा वापर करताना दिसतात.

सायकल कोळप्याला पसंतीसध्या बैलजोड्यांची संख्या कमी झाल्यामुळे शेतकरी आंतरमशागतीसाठी सायकल कोळप्याला पसंती देताना दिसतात़ एक व्यक्ती दिवसभरात सायकल कोळप्याने एक ते दीड एकर क्षेत्र आंतरमशागत करू शकतो़ हेच काम मुजरीवर एका महिलेला किमान दोन हजार रुपये मोजावे लागतात़ तणनाशक फवारायचे म्हटल्यास जवळपास एक हजार रुपये खर्च येतो़ सर्वच शेतकºयांकडे बैलजोड्या नाहीत़ त्यामुळे शेतकरी सध्या तूर, मूग, उडीद, सोयाबीन या खरीप पिकात आंतरमशागतीसाठी सायकल कोळपणीला अधिक पसंती देत असल्याचे दिसून येते़ 

यंदा सर्वच नक्षत्रात चांगला पाऊस झाला आहे़ त्यामुळे तालुक्यात खरिपाची पेरणीही वेळेवर झाली़ त्यामुळे सध्या सर्वच पिके जोमाने आली आहेत़ शिवाय सततच्या पावसामुळे या पिकांत तण वाढत आहे़ शिवाय आमच्याकडे बैलजोडी नाही़ त्यामुळे सायकल कोळपणीद्वारे आंतरमशागत करीत आहे़ - मल्लिनाथ भासगी,शेतकरी, सलगर

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी