मोहोळ तालुक्यातील येणकी गावातील शेतकरी लहू पंढरी जाधव यांच्या विहिरीमध्ये घोणस हा विषारी साप पडल्याची माहिती त्यांनी मोहन माने यांना दिली. माने यांनी त्वरित त्यांचे मामा व वाईल्डलाईफ कॉझर्वेशन असोसिएशनचे सदस्य सोमानंद डोके यांना याबाबत कळविले. त्यांनतर सदस्य डोके व सुरेश क्षीरसागर दोघे सोलापूरहून जवळजवळ ५० किमीचा प्रवास करून येणकी गावात दाखल झाले. तेथे पोहोचल्यानंतर विहिरीची पाहणी केली. विहिरीला पायऱ्या नसल्याने सापांना बाहेर कसे काढायचे हा मोठा प्रश्न दोघांसमोर उभा राहिला.
यावर त्यांनी शक्कल लढवून एक भाजीचे कॅरेट व दोन दोऱ्यांच्या सहाय्याने दोन्ही बाजूने बांधून कॅरेटला अलगदरित्या विहिरीत सोडण्यात आले.
ते कॅरेट विहिरीत पडलेल्या सापांजवळ नेऊन एकेक सापांना अलगदरित्या कॅरेटमध्ये उचलून विहीरीतून यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आले. त्या सापांना सुरक्षितरित्या विहीरीबाहेर काढल्यानंतर त्यांना एका पोत्यामध्ये बंद करून पुन्हा निसर्गाच्या सान्निध्यात सोडून देण्यात आले.
या बचावकार्यात शेतकरी लहू जाधव, मोहन माने, शुभम माने व वाईल्डलाईफ कॉझर्वेशन असोसिएशनचे
सदस्य सोमानंद डोके व सुरेश क्षीरसागर उपस्थित होते.
---
१०० सापांना आजवर जीवदान
आजतागायत विहीरीत पडलेल्या अशा तब्बल १०० सापांना वाईल्डलाईफ कॉझर्वेशन असोसिएशनच्या माध्यमातून
सुरक्षित बाहेर काढून जीवदान देण्यात आलेले असल्याचे सोमानंद डोके व सुरेश क्षीरसागर यांनी सांगितले.
फोटो २२वडवळ-साप
येणकी येथील विहिरीमधून घोणस सापांना असे कॅरेट मधून बाहेर काढण्यात आले.