सोलापूर : कौटुंबिक वादातून मुलीने दुसºया मजल्यावरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, ही माहिती कळताच मुलीच्या वडिलांनी बेडरुममध्ये गळफास घेण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही घटना पोलिसांच्या समक्ष घडल्या. यामुळे मुलगी व वडिलांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़ याबाबत हवालदार भाऊसाहेब कृष्णात दळवे (नेमणूक सदर बझार पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी हवालदार भाऊसाहेब दळवे ड्युटीवर असताना गुरुवारी रात्री त्यांना गेंट्याल टॉकिजजवळ रुक्मिणी कॉम्प्लेक्स येथील दुसºया मजल्यावर घरगुती भांडण सुरू असल्याची माहिती कळाली़. त्या माहितीवरून दळवे हे तेथे पोहोचले़ तेव्हा तेथे कविता विटकर व आरती विटकर या दोघांमध्ये भांडण सुरू होते़. त्यावेळी विठ्ठल विटकर हे तेथेच उपस्थित होते़. त्यावेळी त्यांच्या डोक्यातून रक्त येत होते़ यामुळे दळवे यांनी विठ्ठल यांना दवाखान्यात उपचारासाठी जाण्यास समजावून सांगत असताना आरोपी आरती विठ्ठल विटकर (वय २३, रा़ रुक्मिणी कॉम्प्लेक्स, गेंट्याल टॉकिज) हिने राहत्या घराच्या दुसºया मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला़. त्यात आरती हिला डोक्यास व उजव्या पायास गंभीर जखम झाली़. यामुळे तिला उपचारासाठी दळवे व आरतीच्या भावाने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी पाठवले़. दरम्यान, वडील विठ्ठल चन्नाप्पा विटकर (वय ५३, रा़. रुक्मिणी कॉम्प्लेक्स) यांनी घरात बेडरुमचे आतून दार लावून घेऊन गळफास घेण्याचा प्रयत्न करत होते.
पोलिसांना ही माहिती कळताच त्यांनी दरवाजा तोडून बेडरुममध्ये प्रवेश केला आणि विठ्ठल यांच्या गळ्याची फास काढत त्यांना हॉस्पिटलमध्ये बेशुद्धावस्थेत दाखल केले़. यामुळे आरोपी विठ्ठल विटकर व आरोपी आरती विठ्ठल विटकर यांच्याविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे़. घटनेचा तपास पोलीस सहायक इन्स्पेक्टर शेख हे करत आहेत.