याप्रसंगी सोपान गायकवाड, सैदप्पा झळकी, प्रसाद माने, अप्पा भालेराव, विजयकुमार पोतेनवरू, अंबादास गायकवाड, रवी सलगरे, चंद्रकांत गायकवाड, मंजुनाथ बनसोडे, शुभम मडिखांबे, आकाश मडिखाबे, अंबादास शिंगे, सुरेश सोनकांबळे, तम्मा धसाडे, परमेश्वर आयवळे, प्रशांत मडिखांबे, सुरेश वसोनकांबळे, शिवानंद धोडमणी, संगोळगी सरपंच बसुराज निम्मे, कृष्णा धोडमणी रमेश धोडमणी, गुंडू कांदे, शिवराज जमगे, श्रीकांत गायकवाड, नागेश मडिखाबे उपस्थित होते.
रमाई आवास व प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना मोफत वाळू देण्यात यावी. केवळ वाळू उपलब्ध नसल्यामुळे घरकूल बांधकाम रखडलेले आहे. त्यामुळे बांधकाम मिस्त्री व मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. तरी तालुक्यातील नदीकाठच्या ठिकाणची वाळू लिलाव काढून ती उपलब्ध करून देण्यात यावे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. निराधार योजनाच्या लाभार्थ्यांना अनुदान त्वरित वाटप करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी उपोषणास सुरू केले आहे.