साेलापूर : राष्ट्रवादीत नवे लाेक येत आहेत. त्यांचे स्वागतच केले पाहिजे. मात्र, महापालिका निवडणुकीत उमेदवारी देताना आजवर पक्षासाेबत राहिलेल्या जुन्या कार्यकर्त्यांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी रविवारी केली.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर राष्ट्रवादीच्यावतीने एका मंगल कार्यालयात बैठक झाली. यावेळी गादेकर बाेलत हाेते. शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, माजी महापौर महेश कोठे, युवक अध्यक्ष जुबेर बागवान, नगरसेवक तौफिक शेख, प्रदेश उपाध्यक्ष शफी इनामदार, सुभाष पाटणकर, महेश गादेकर, मनोहर सपाटे, पद्माकर काळे, परिवहन माजी सभापती राजन जाधव, महिला शहराध्यक्षा सुनीता रोटे आदींची प्रमुख उपस्थिती हाेती.
गादेकर म्हणाले, पक्षवाढीसाठी नव्या लाेकांना घेणे गरजेचे आहे. जुन्या लाेकांचाही सन्मान झाला पाहिजे. आगामी निवडणुकीत इलेक्टीव्ह मेरिटनुसार उमेदवारी द्या. नव्या कार्यकर्त्यांला उमेदवारी देताना जुन्या लाेकांना कमिटी किंवा इतर काही देता येईल का, याचा विचार झाला पाहिजे.
यावेळी विधानसभा अध्यक्ष अमीर शेख, प्रकाश जाधव, तन्वीर गुलजार, दिनेश शिंदे, जावेद खैरादी, अजित बनसोडे, युवक प्रदेश पदाधिकारी चेतन गायकवाड, युवती शहराध्यक्ष आरती हुल्ले आदी उपस्थित हाेते. बैठकीनंतर राजू कुरेशी, गाेविंद एकबाेटे, बशीर शेख, गफूर शेख, सर्फराज शेख, फारूक मटके, राष्ट्रवादीचे चित्रपट कला सांस्कृतिक सेलचे कार्याध्यक्ष जब्बार मुर्शद, धनंजय यांचा सत्कार झाला.
---
राष्ट्रवादीची प्रभाग यात्रा
कार्याध्यक्ष संताेष पवार म्हणाले, मनपा निवडणुकीच्या तयारीसाठी पाच सप्टेंबरपासून सकाळी व सायंकाळी तीन विधानसभा मतदारसंघातील प्रभागात प्रभाग संवाद यात्रा हाेणार आहे. शहरातील वातावरण आता बदलत आहे. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वाधिक उमेदवार निवडून येतील. या यात्रांमध्ये इच्छुक कार्यकर्त्यांना सहभागी करून घ्यावे. त्यांना साेबत घेऊनच यात्रा करावी, अशी मागणी जुबेर बागवान यांनी केली.