जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. यासाठी आरोग्य विभाग योग्य व उत्तम प्रकारे काम करत आहे. परंतु नोंदणी झालेले ग्रामस्थ, संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात होणारा लसीचा पुरवठा आणि मागणीमध्ये मोठी तफावत आहे. यामुळे अनेक नागरिकांना लस न मिळाल्याने माघारी परतावे लागत आहे. ज्या केंद्रावर लस उपलब्ध आहे त्या केंद्रावर गाव व परिसरातील नागरिक लसीकरणासाठी सकाळी ७ वाजल्यापासून रांगेत उभा राहत आहेत. परंतु अपुऱ्या लसीच्या पुरवठ्यामुळे नागरिकांना घर ते रुग्णालय वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. यासाठी प्रशासनाने योग्य ते नियोजन करून पंढरपूर तालुक्यामधील महसुलीदृष्ट्या मोठी गावे असणाऱ्या, ज्या गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे, अशा गावांत आठवड्यातून दोन दिवस लसीकरण मोहीम राबवावी, अशी मागणी ॲड. गणेश पाटील यांनी केली आहे.
लसीचा कोटा वाढविण्यास प्राधान्य द्या : पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 4:22 AM