सोलापूर : आपण शरद पवार, सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढविली. गेल्या तीन वर्षात मी कुणाला त्रास दिला का? माझ्या घराचा विषय काढण्यात आला. मी दोषी असेल तर कोणतीही शिक्षा घ्यायला तयार आहे. मी बांगड्या घालून काम करीत नाही, असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील भाजपा प्रणित श्री सिध्दरामेश्वर परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.देशमुख म्हणाले, बाजार समित्या या शेतकऱ्यांचे शोषण करीत आहेत. नियमांची अंमलबजाणी न करणाºया लोकांना आपण ठेचून काढणार आहोत. बाजार समित्या दलालमुक्त करणार असल्याचे सहकारमंत्र्यांनी सांगितले.
दोषी असल्यास कोणतीही शिक्षा द्या - सुभाष देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 5:01 AM