शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

परदेशातील ग्लोबल सोलापूरकर म्हणतात...; सोलापूर बदलतंय... पण वेग वाढायला हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 8:05 PM

 विलास जळकोटकर सोलापूर : बहुभाषिक संस्कृतीचा अभिमान असलेली सोलापूर शहरातील तरुणाई आपलं टॅलेंट घेऊन बाहेर पडली.. खूप मोठी झाली.. ...

ठळक मुद्देसोलापूरच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं राष्टÑीयस्तरावरील तंत्रपरिषदबहुभाषिक संस्कृतीचा अभिमान असलेली सोलापूर शहरातील तरुणाई आपलं टॅलेंट घेऊन बाहेर पडली

 विलास जळकोटकर

सोलापूर : बहुभाषिक संस्कृतीचा अभिमान असलेली सोलापूर शहरातील तरुणाई आपलं टॅलेंट घेऊन बाहेर पडली.. खूप मोठी झाली.. बहुराष्टÑीय कंपन्यांमध्ये आपला ठसा उमटवला. पण आपल्या मातृभूमीबद्दलचा अभिमान अद्यापही त्यांच्या मनात कायम ठेवलाय. शनिवारी सोलापुरात वालचंद शिक्षण समूहाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ही प्रचिती आली. बदलत्या सोलापूरबद्दल त्यांनाही अप्रूप वाटलं.. तसं त्यांनी बोलूनही दाखवताना हा वेग वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली. विकासाच्या दृष्टीनं बाहेरुन येणाºया विविध क्षेत्रांना आकर्षित करण्यासाठी पायाभूत सुविधांची अपेक्षा व्यक्त केली. आमच्या शहरासाठी आम्ही सोबत आहोत, असा सकारात्मक सूर व्यक्त केला.

सोलापूरच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं राष्टÑीयस्तरावरील तंत्रपरिषद २२ आणि २३ मार्च अशी दोन दिवस पार पडली. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेल्या या सोलापुरी उच्चपदस्थांशी संवाद साधता आला. त्यातील निखिल किणीकर सध्या अमेरिका (बोस्टन) येथे वास्तव्यास आहेत. तेथे त्यांनी नेक्सच्युअर कंपनीची स्थापना करुन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. दुसरे विश्वेश पागे हैद्राबाद येथील टेक महिंद्राचे सबजेक्ट मॅटर एक्स्पर्ट फॉर पार्कर इंडिया लिमिटेडमध्ये आहेत. पुण्यात बी.व्ही.जी. (भारत विकास ग्रुप) चे संचालक  असलेले गणेश लिमये,  के. एस.बी. पंप लिमिटेडचे (आफ्टर मार्केटिंग) उपमहाव्यवस्थापक राजेश कुलकर्णी आणि  शिक्षणाच्या निमित्तानं सोलापुरात वास्तव्य केलेले बहुराष्ट्रीय कंपनी  एम-को लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीरज यादव या साºयांनी सोलापूरच्या विकासाबद्दलच्या संकल्पना मांडल्या.

औद्योगिक, शैक्षणिक, वैद्यकीय तसेच पर्यटनाच्या बाबतीत सोलापूर वाढलं पाहिजे अशी भूमिका व्यक्त करताना इथल्या लिडरशिपनेही इच्छाशक्ती बाळगली पाहिजे. परदेशातून, परराज्यातून येणाºया औद्योगिकीकरणासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्याशिवाय कोणी आपल्या शहराकडं आकर्षित होणार नाही हे वास्तवही उलगडलं. यासाठी सामूहिकरित्या जोर लावला पाहिजे अशी भूमिका मांडली. २०-२५ वर्षांपूर्वी इथं पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्यामुळेच आम्हाला शहर सोडावं लागलं. इथला शिक्षित वर्ग बाहेर जाऊ नये असे वाटत असेल तर राज्यकर्त्यांपासून ते विविध क्षेत्रातील जाणकारांच्या सामूहिक प्रयत्नानं हे शक्य होईल, असाही आशावाद व्यक्त केला. 

रोजगार वाढीसाठी काय करता येईल याचा विचार सोलापूरकर म्हणून प्रत्येकांनी करायला हवा. अभियांत्रिकी शिक्षणाच्या निमित्तानं २० वर्षांपूर्वीचं चित्र पालटल्याचं दिसतंय. पण एवढ्यावर थांबून चालणार नााही. पायाभूत सुविधा असल्याशिवाय इथं कोणी यायला तयार होणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. इथं ट्रान्स्पोर्ट हब, मेडिकल हब, एज्युकेशन हबसाठी पुरता जोर लावलातरच शहराचा विकास वेगाने होण्यास मदत होईल. - नीरज यादव, सीईओ,  एम-को लिमिटेड बहुराष्टÑीय कंपनी

सोलापुरात इंडस्ट्रीयल, सॉफ्टवेअर उद्योग सुरु करण्यासाठी मोठ्या प्रमाणात संधी आहे. याचा उपयोग करून घेता आला पाहिजे. मध्यंतरीच्या काळात विकासाचा वेग कमी  झाला. त्याला अनेक कारणे असू शकतात. पण आता बदल घडतोय. शिक्षण क्षेत्र, औद्योगिक क्षेत्रात प्रगती होण्यासाठी सामूहिक प्रयत्न व्हायला पाहिजेत. आम्ही नोकरी व्यावसायाच्या दृष्टीने कुठेही गेलो आणि सोलापूरकर भेटला की, सोलापूरबद्दलची कनेक्टीव्हिटी फार महत्त्वाची वाटते. शिक्षण क्षेत्रात प्लेसमेंटप्रमाणेच प्रोजेक्ट मिळवण्यासाठीही प्रयत्न व्हायला पाहिजेत. - विश्वेश पागे, टेक महिंद्रा, हैदराबाद

 बँकांकडून मदत मिळणे,  त्यांना सपोर्ट करणारा वर्ग मिळायला हवा. थॉट लिडरशिप वाढायला हवी, इंडस्ट्री, अ‍ॅकॅडमीक ग्रोथ वाढली पाहिजे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनेही विचार व्हायला पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात तुम्ही स्वत: प्रगती केली पाहिजे जेणेकरुन इंडस्ट्रीकडून तुमच्याकडे विचारणा केली पाहिजे. यासाठी  नुसतं बोलणं नाही, सकारात्मक पुढाकार घ्यायला हवा. -निखिल किणीकर, सीईओ, नेक्सच्युअर कंपनी, अमेरिका, बोस्टन

सोलापूर पूर्वी  टिपिकल गिरणगाव म्हणून ओळखलं जायचं. आता  ही ओळख पूर्णत: बदललीय. इथं विकासाची स्वप्नं दिसू लागलीत. आपली संपन्नता लक्षात घेऊन आजूबाजूला असलेल्या धार्मिक तीर्थक्षेत्राचा पर्यटन वाढीला चालना मिळू शकते.  शिवाय इंडस्ट्रीयल एरियाही वाढतोय, त्यांना बळ मिळायला हवं.  एनटीपीसीसारखे पाच-सहा प्लँट यायला हवेत. गेल्या २० ते २५ वर्षांत इंडस्ट्रीज वाढली असती तर पुण्या, मुंबईकडे जाणारा लोंढा कमी झाला असता. - राजेश कुलकर्णी, उपमहाव्यवस्थापक, के.एस.बी.पंप लिमिटेड

सोलापूरचा विकास बºयापैकी वाढू लागलाय. साखर उद्योगही वाढतोय. शहरातला विचार करता इथं पूर्वी चादरी तयार व्हायच्या आता एक्सपोर्टचे टॉवेल तयार होताहेत. सोलापूरबद्दल असं ऐकलं की बरं वाटतं. आपल्या शहराचं मार्केटिंग आपणच करायला पाहिजे. पुण्याच्या चितळे भाकरवडीची चर्चा करतो मग आपल्याच  सोलापूरची कडक भाकरी, चटणीची का चर्चा होत नाही.  यात आपल्या प्रत्येकांची ती जबाबदारी आहे. आपल्या शहराचा विकासाचा स्तर वाढवण्यासाठी काय करावे लागेल याचा विचार व्हायला पाहिजे. सोलापुरात इंडस्ट्रीज का वाढत नाही हा कायम प्रश्न आहे. पाण्याचा प्रश्नही असू शकेल. शिक्षणक्षेत्रात चांगली प्रगती दिसतेय. सोलापूरचं चित्र अधिक चांगलं होण्यासाठी प्रयत्न करु यात आम्ही सोबत आहोत.  - गणेश लिमये, संचालक, भारत विकास ग्रुप, पुणे

टॅग्स :Solapurसोलापूरcollegeमहाविद्यालयSmart Cityस्मार्ट सिटीEducationशिक्षण