सोलापूर : भावसार समाजातील आदर्श काम करणा कर्तृत्ववान महिलांचा युनायटेड भावसार ऑर्गनिसशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त सत्कार करण्यात आला.
रविवार सकाळी हिंगुलांबीका सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष अश्विन डोईजोडे, अध्यक्ष किरणकुमार मुसळे, महिला अध्यक्ष सरिता जवळकर, युबीओ सोलापूर अध्यक्ष किरणकुमार मुसळे यांच्या हस्ते महिलांचा गौरव झाला. यावेळी युबीओ महिला सदस्य व भावसार महिलांचा हळदीकुंकू समारंभ पार पडला.
याच कार्यक्रमात सदस्या डॉ. कीर्ती कटारे याचे महिलांचे आरोग्य या विषयावर व्याख्यान झाले. दररोजच्या आहार बाबत त्यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर सचिव सिद्राम हंचाटे, जेष्ठ महिला सदस्य उमा हिबारे उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी श्वेता मुसळे सुषमा डोईजोडे, ज्योती क्षीरसागर, ज्योती झिंगाडे यांनी परिश्रम घेतले.
----
यांचा झाला गौरव...
रेखा आनंद पारेकर, रुपाली अमोल पारेकर, डॉ. कोमल गोविंद बेळमकर, साक्षी लक्ष्मीकांत महिंद्रकर, स्नेहलता संजय क्षीरसागर, उमा हिबारे, डॉ. कीर्ती कटारे, रसिका वळसे, रणसुभे, डॉ शैलजा लिमकर, खमीतकर, इंदूताई वायचळ, स्नेहा रंगदाळ, आरती हंचाटे, अंजू हर्षद क्षीरसागर, विद्या सिद्राम हांचाटे, डॉ. प्रीती वायचळ
---
०७ भावसार
भावसार समाजातील महिलांचा गौरव करताना अश्विन डोईजोडे, किरणकुमार मुसळे, सरिता जवळकर,