शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
5
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
6
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
7
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
8
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
9
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
10
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
11
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
12
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
13
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
14
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
15
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
16
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
17
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
18
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
19
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान

सरळ स्ट्रेट जाऊन उजवीकडे राईटला वळा़ !

By admin | Published: July 22, 2016 7:46 PM

हल्ली तरुणाईच्या मुखी अनेक नवे ट्रेंड रुढ होऊ पाहत आहेत. अनेक कोडवर्ड भाषांमुळे अनेकांची पंचाईत होते. काही समजत नाही. सहज तरुणाईचा घोळका थांबला असेल आणि एखाद्या

- विलास जळकोटकर सोलापूर, दि. 22 - हल्ली तरुणाईच्या मुखी अनेक नवे ट्रेंड रुढ होऊ पाहत आहेत. अनेक कोडवर्ड भाषांमुळे अनेकांची पंचाईत होते. काही समजत नाही. सहज तरुणाईचा घोळका थांबला असेल आणि एखाद्या अनोळखीने पत्ता विचारला तर त्याला हमखास उत्तर मिळतं ते कसं पाहा.. हे बघा, सरळ स्ट्रेट जाऊन उजवीकडे राईटला वळा... मंडळी इंग्रजी-मराठी शब्दांची भेळमिसळ करताना आपण भाषेची पुरती वाट तर लावतोच याचे भान राहत नाही पण यात आपलंही हसं होतं. या विषयाच्या अनुषंगाने अनेकांशी संवाद साधताना त्यांनी प्रांजळ कबुली देत सुधारण्याची अपेक्षा व्यक्त केली.दोन्ही किंबहुना अनेक भाषांतील शब्दांचा वापर करुन बोलण्याची लकब तशी महाराष्ट्रात कोठेही जा ऐकायला मिळेल. फक्त त्या त्या परिसराची त्याला जोड दिलेली असते. सोलापूर शहर तसं सीमावर्ती भागाशी जोडलेलं असल्यानं इथं अनेक भाषांचा संगम झाल्याचं दिसून येतं. अख्ख्या महाराष्ट्रात विखुरल्या गेलेल्या बहुतांश भाषा बोलण्याने मंडळी इथं गुण्यागोविंदाने नांदतात. साहजिकच यामुळे अगदी मराठी, कानडी, तेलुगू मध्येच इंग्रजी अशा भाषा एकाचवेळी त्यांच्या बोलण्यातून जाणवतात. यातून अनेकदा जाणकार मराठी भाषिक शब्दप्रभूंचा मात्र गोंधळ उडतो. अनेकदा त्यांना काही समजत नाही. पण जो बोलणारा आणि ऐकणारा आहे त्याला मात्र ते हमखास समजते. सोलापुरात जी खासियात आहे ती अन्य ठिकाणी सारखीच असेल असे नाही, मात्र तेथील लकबीनुसार त्याला वेगळी परिभाषा तरुणाईत आढळत आहे.

सोलापुरी मिक्स मजेशीर परिभाषाबहुभाषिक सोलापुरात एकाच अर्थाचे दोन भाषांमधील शब्द एकाच वाक्यात बोलण्याची भाषा स्टाईल प्रचलित आहे. त्यातले काही वाक्य पाहा. ते दुकान खाली बेसमेंटला आहे, मुलींची कन्या प्रशाला, मोठा बिग बाजार, त्यामागच बॅकग्राऊंड, मी त्यांच्या अंडरखाली खाली काम करतो, ओव्हरआॅल सर्व, आताच जस्ट आलो, तुझ्या केसाची हेअरस्टाईल लई भारी हाय बे, ठंका कोल्ड ड्रिंक द्या, मैदानाला गोल राऊंड मारुन आलो, इस्त्री दाबून प्रेस करा, कचरा खाली बॉटमला टाका अशा अनेक समानार्थी शब्द बोलण्याची जणू तरुणाईमध्ये फॅशन बनली आहे. यात भाषेचे मात्र तीन तेरा होतात याकडे कोणाला देणंघेणं नसतं.