शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

देवीच्या तलवार, त्रिशुल, चक्रला चकाकी, किरीट, कंबरपट्टा, बाजुबंदला झळाळी; सोलापुरातील आठ करागिर कलाकुसरीच्या कामात मग्न

By काशिनाथ वाघमारे | Published: October 05, 2023 5:58 PM

घटस्थापनेला नऊ दिवस राहिले असून नवरात्र मंडळांच्या देवीच्या आयुधांना चकाकी आणि तिच्या दागिन्यांना झळाळी देण्याचे काम सुरू झाले आहे.

सोलापूर : घटस्थापनेला नऊ दिवस राहिले असून नवरात्र मंडळांच्या देवीच्या आयुधांना चकाकी आणि तिच्या दागिन्यांना झळाळी देण्याचे काम सुरू झाले आहे. सोलापूर शहरात केवळ आठ कारागिर असून रात्रीचा दिवस करुन ही कामे केली जात आहेत. नवरात्रोत्सवात देवीला नऊ दिवस विविध रुपात, अवतारात सजवण्याची परंपरा सर्वत्र आहे. त्यामुळे तिची दागिने आणि आयुधं (शस्त्रं) ही स्वच्छ करुन तिला चकाकी देण्याचे काम नवरात्रोत्सवापूर्वी होत असते. वापरातील देवीच्या मनी मंगळसूत्रापासून ते नेकलेसपर्यंतची सर्वच दागिने आणि शस्त्रांना उजळवण्यासाठी कार्यकर्त्यांची धडपड सुरू आहे.

सोलापूर शहरात सराफ व्यवसायिकांचा संख्या मोठी आहे, मात्र कारागिरांची संख्या केवळ आठ आहे. यंदा मजुरीत आणि अॅसीडसह इतर लागणा-या साहित्यांच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे पूर्वी चकाकी अन झळाळीसाठी दीड, दोन हजारांचा खर्च यायचा. आता तो अडीच हजारांव गेला आहे. थाळीव कामाला लागतो वेळदेवीचे चांदीचे किरीट, बाजुबंद, कंबरपट्टा, प्रभावळी या दागिन्यांसह त्रिशुल, तलवार, गदा, चक्र या आयुधांवर नक्षीकाम मोठ्या प्रमाणात असते. यालाच थाळीव काम म्हणतात. हे काम किचकट आणि वेळखाऊपणाचे आहे. त्यामुळे ही कामं वर्ष ते दहा महिने आधीपासून बूक होतात. हीच कामं ब-याचदा सराफ व्यवसायिकाकडे मंडळाकडून येतात. ती सराफांच्या माध्यमातून कारागिरांकडे येतात.

टॅग्स :Solapurसोलापूर