सचिन कांबळे
पंढरपूर : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि., वेणूनगर-गुरसाळे, (ता. पंढरपूर, जि.सोलापूर) कारखान्याच्या ३ गोडाऊनला दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सिल केले आहे.
वेणूनगर-गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि., ची चल मालमत्तेचा (साखरसाठा) ताबा दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई यांचे मार्फत प्राधिकृत अधिकारी कैलास नामदेव घनवट, प्रादेशिक कार्यालय, पुणे यांनी सेक्युरिटायझेशन कायदा २००२, कलम १३ (४) अन्वये तसेच डी. आर.टी कोर्ट, पुणे दावा क्र.एस.ए.६२/२०२४ मध्ये २५ एप्रिल २०२४ रोजी झालेल्या सुनावणी मध्ये मा. कोर्टाने दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप बँकेच्या, सरफेसी कायद्यान्वये कारखान्याच्या मालमत्ता जप्ती अनुषंगाने दिलेला स्टे उठविल्यानुसार व पुरक नियमाप्रमाणे २६ एप्रिल २०२४ रोजी ताबा घेतला आहे.
सर्व कर्जदार व आम जनतेस सुचित करण्यात येते की, सदर उपरोक्त कारखान्याच्या चल मालमत्तेचा कोणाशीही कुठल्याही प्रकारचा हस्तांतर/तबलीचा/ विक्रीचा व्यवहार करू नये अशा प्रकारचे व्यवहार केल्यास ते बेकायदेशीर ठरतील यांची नोंद घ्यावी. असे दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकचे प्राधिकृत अधिकारी कैलास नामदेव घनवट यांनी आवाहन केले आहे.
'न्यायालयात केस चालू होती, काल स्टे उठला आहे. आणि आज सकाळी तात्काळ अधिकाऱ्यानी गोडाऊन सील केले आहे. १ लाख पोती साखर शिल्लक आहे. साखर विकून शेतकऱ्यांची भेट द्यायची होती.
-: अभिजीत पाटील, अध्यक्ष श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना