शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
4
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
5
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
6
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
7
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
8
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
9
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
10
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
11
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
12
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
13
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
14
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
15
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
16
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
17
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
18
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
19
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
20
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती

श्री महालक्ष्मीसाठी सोन्याची पालखी

By admin | Published: July 28, 2014 11:57 PM

पंधरा कोटी खर्च : त्रिशताब्दी वर्षात होणार लोकार्पण

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मूर्तीच्या पुनर्स्थापनेला २०१५ मध्ये ३०० वर्षे पूर्ण होत आहेत. या त्रिशताब्दी सोहळ्यानिमित्त श्री महालक्ष्मीसाठी लोकसहभागातून सोन्याची पालखी बनवण्यात येणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पालखीसाठी १५ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असून, त्यासाठी कोल्हापूरच्या नागरिकांनी व भाविकांनी यथाशक्ती सोनेरूपात अथवा धनादेशाच्या रूपात देणगी द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. ते म्हणाले, साडेतीन शक्तीपीठ असलेल्या महालक्ष्मी मूर्तीच्या पुनर्प्रतिष्ठापनेला २०१५ सालच्या दसऱ्याला ३०० वर्षे पूर्ण होत आहेत. या प्रसंगाचे औचित्य राखून भाविकांच्या आणि कोल्हापुरातील नागरिकांच्या सहकार्यातून महालक्ष्मीसाठी सोन्याची पालखी बनवण्यात येणार आहे. या सोबतच सोन्याचे मोर्चेल, चवऱ्या, सुवर्ण कलशांकीत सूर्य-चंद्र, अबदागिऱ्या बनवण्याची संकल्पना आहे. अत्यंत पारदर्शीपणे हा प्रकल्प राबवण्यात येणार असून, त्यासाठी धर्मादाय आयुक्तांकडून रितसर विश्वस्त मंडळाची स्थापना केली जाईल. उत्तम दर्जाच्या लाकडापासून व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार पालखी बनवल्यानंतर ती सोन्याने मढवण्यात येणार आहे.