सोलापूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी त्यावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. गेल्या २४ तासांत १३२७ जणांनी कोरोनाला हरविले. कोरोनामुळे ४० जणांचा मृत्यू झाला असून, २४ तासांत १५३७ रुग्णही वाढले आहेत.
महापालिका क्षेत्रात १५४५ चाचण्यांमधून १३२८ रुग्ण आढळून आले. यापूर्वी रुग्णालयात दाखल असलेल्या ४३६ जणांनी कोरोनावर मातही केली. ७२६ जण होम क्वारंटाइननंतर १५० जण क्वारंटाइन सेंटरमध्ये आहेत. ४१ जण घरात राहूनच उपचार घेत आहेत. मृतांमध्ये जोडभावी पेठ परिसरातील ५६ वर्षीय पुरुष, क्षत्रिय गल्ली मंगळवार पेठ परिसरातील ६८ वर्षीय पुरुष, भाग्योदय सोसायटी अंत्रोळीकर नगर परिसरातील ७० वर्षीय महिला, गोविंदश्री मंगल कार्यालयाजवळ जुळे सोलापूर येथील ७९ वर्षीय पुरुष, धरमसी लाइन मुरारजी पेठ येथील ४३ वर्षीय पुरुष, मुरारजी पेठ परिसरातील ५० वर्षीय पुरुष, रोहिणीनगर सैफुल परिसरातील ५५ वर्षीय महिला, निरापाम सोसायटी विजापूर रोड परिसरातील ७२ वर्षीय पुरुष, गुरुदेव दत्तनगर सैफुल परिसरातील ७३ वर्षीय पुरुष, श्रीशैलनगर विजापूर रोड परिसरातील ४१ वर्षीय पुरुष, रविवार पेठ परिसरातील ६१ वर्षीय पुरुष, जवळकर वस्ती बुधवार पेठ परिसरातील ४५ वर्षीय पुरुष, निहार रेसिडेन्स मोहितेनगर परिसरातील ४१ वर्षीय पुरुष, आदित्यनगर विजापूर रोड परिसरातील ७७ वर्षीय पुरुष, आसरा सोसायटी परिसरातील २९ वर्षीय तरुण, जुना संतोषनगर परिसरातील ७७ वर्षीय पुरुष, बालाजी मंगल कार्यालयाजवळ जुळे सोलापूर परिसरातील ७४ वर्षीय महिला, विश्वकर्मा पार्क जुळे सोलापूर परिसरातील ५४ वर्षीय पुरुष, जानकरनगर लक्ष्मी पेठ परिसरातील ३६ वर्षीय पुरुष, विजयनगर जुळे सोलापूर परिसरातील ५० वर्षीय महिलेचा समावेश आहे.
-------
ग्रामीण भागात ६ हजार १२९ चाचण्यांमधून १३२० रुग्ण आढळून आले. यापूर्वी रुग्णालयात दाखल असलेल्या ८९१ जणांना घरी सोडण्यात आले. मृतांमध्ये वाफेगाव, ता. माळशिरस येथील ६० वर्षीय पुरुष, सोनके, ता. पंढरपूर येथील ६५ वर्षीय महिला, ईसबावी पंढरपूर येथील ५६ वर्षीय महिला, सुपली, ता. पंढरपूर येथील ५० वर्षीय पुरुष, शिरगाव, ता. पंढरपूर येथील ५५ वर्षीय महिला, संत पेठ पंढरपूर येथील ६५ वर्षीय महिला, वाखरी, ता. पंढरपूर येथील ५५ वर्षीय महिला, अनगर, ता. मोहोळ येथील ५१ वर्षीय महिला, वडदेगाव, ता. मोहोळ येथील ७० वर्षीय पुरुष, पेनूर, ता. मोहोळ येथील ३५ वर्षीय तरुण, आष्टी, ता. मोहोळ येथील ६७ वर्षीय महिला, बुधवार पेठ मोहोळ येथील ४७ वर्षीय पुरुष, बिटले, ता. मोहोळ येथील २१ वर्षीय तरुणी, कळमण, ता. उत्तर सोलापूर येथील ६५ वर्षीय महिला, कौठाळी, ता. उत्तर सोलापूर येथील ८२ वर्षीय महिला, गावडी दारफळ, ता. उत्तर सोलापूर येेथील २८ वर्षीय तरुण, बीबी दारफळ, ता. उत्तर सोलापूर येथील ४० वर्षीय पुरुष, अलिपूर रोड बार्शी येथील ६६ वर्षीय पुरुष, पानगाव, ता. बार्शी येथील ७१ वर्षीय महिला, पंकजनगर बार्शी येथील ८५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
जिल्ह्यातील मृतांची एकूण संख्या झाली २६२१
ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६८ हजार ५७ झाली आहे. यापैकी ५६ हजार ५७ जण बरे झाले आहेत. अद्यापही १० हजार ४५१ जण रुग्णालयात आहेत. मृतांची एकूण संख्या १५४९ झाली आहे. शहरातील बाधित रुग्णांची एकूण संख्या २४ हजार ३४५ झाली आहे. यापैकी १९ हजार ७८९ जण बरे झाले आहेत. अद्यापही ३ हजार ४८४ जण रुग्णालयात आहेत. मृतांची एकूण संख्या १०७२ झाली आहे.